भ्रष्टाचाऱ्यावर खटले भरण्याचे जनमंचतर्फे स्वागत
By admin | Updated: February 6, 2015 22:35 IST
भ्रष्टाचाऱ्यावर खटले भरण्याचे जनमंचतर्फे स्वागत
भ्रष्टाचाऱ्यावर खटले भरण्याचे जनमंचतर्फे स्वागत
भ्रष्टाचाऱ्यावर खटले भरण्याचे जनमंचतर्फे स्वागतनागपूर : भ्रष्ट कर्मचाऱ्यांवर ९० दिवसांत खटले भरण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे जनमंचतर्फे स्वागत करण्यात आले आहे. भ्रष्टाचारात रंगेहात पकडलेल्या कर्मचाऱ्यांना ६ महिने निलंबित ठेवल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी त्याच पदावर पदस्थापना करण्यात येत असे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत होता. निलंबन कालावधीमध्ये वेतनाच्या ७५ टक्के निर्वाह भत्ता देण्यात येत होता. यामुळे भ्रष्टाचार कमी होण्यापेक्षा तो वाढतच असल्याचे दिसून येत होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यात विशेष लक्ष घालून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली वर्ग १ व २ च्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाऱ्यांचे प्रकरणाचे पुनरिक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर त्वरीत कारवाई होणार आहे. नागरिकांनी भ्रष्टाचार निर्मूलन विभागाला भ्रष्टाचाराच्या प्रकरणात सहकार्य करण्याचे आवाहन जनमंचतर्फे करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्याच्या या निर्णयाचे स्वागत जनमंचचे अध्यक्ष ॲड. अनिल किलोर व प्रमोद पांडे यांनी पत्रकातून केले आहे.