शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

धुम्रपान सोडायचंय? ‘सोडू’ काही नका, फक्त या गोष्टी खा..

By admin | Updated: June 20, 2017 15:56 IST

..ज्या खाऊ नयेत, असंच आजवर तुम्हाला सांगितलं गेलंय!

- मयूर पठाडेधुम्रपान करणाऱ्यांना कितीही सांगा, अरे धुम्रपान करू नका, आरोग्यासाठी ते फारच घातक आहे, तुमच्या शरीराचं ते खोकडं करून टाकील आणि कॅन्सरसारख्या खतरनाक आजाराची शक्यता बळावून तुमची इहलोकीची यात्राही हे धुम्रपान केव्हाही संपवून टाकील.. आता धुम्रपान करणाऱ्यांना हे काही माहीत नाही, असं थोडीच आहे? पण धुम्रपानाची त्यांची लत सुटता सुटत नाही, हे त्यांची मुख्य समस्या आहे. वेगवेगळे औषधं घेण्यापासून तर नित्यनेमानं संकल्प करूनही ही सवय काही सुटता सुटत नाही, हाच सगळ्यांचा अनुभव आहे. पण धुम्रपान करणाऱ्यांना ही सवय सोडण्यासाठी आता त्यातल्या त्यात सोपा मार्ग आता उपलब्ध झाला आहे. खाण्यापिण्याची काही बंधनं पाळली.. खरं तर खाण्यापिण्यावर बंधनं घालण्यापेक्षा काही गोष्टींचं जर तुम्ही सेवन केलं, तर तुमची धुम्रपान सुटण्याची शक्यता बऱ्याच अंशी वाढू शकते. अर्थात त्यासाठी तुमच्या मनाचा निग्रहही हवाच. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या गोष्टींचं सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या..धुम्रपानाच्या सवयीपासून सुटण्यासाठी काय कराल?

 

१- धुम्रपान करणाऱ्यांना फार काळ त्यापासून दूर राहता येत नाही, ही त्यांची प्रमुख समस्या आहे. त्यामुळे धुम्रपानाची लहर आली की थोडं स्रॅक्स खा.२- स्रॅक्स अशासाठी, की ज्या पदार्थांमध्ये मीठ जास्त प्रमाणात असतं, असे पदार्थ खाल्ल्यास धुम्रपानापासून दूर राहण्याची शक्यता वाढू शकते. फ्रेंच फ्राईज, पॉपकॉर्न, पोटॅटो चिप्स, खारे शेंगदाणे.. यासारख्या पदार्थांमुळे धुम्रपानाची तुमची लहर काही काळ दूर राहू शकते. ३- मात्र यासंदर्भात हेदेखील लक्षात घेणं गरजेचं आहे, की हे पदार्थही आरोग्याला चांगले नाहीत. त्यांचं फार जास्त प्रमाणात सेवन करणं दुसऱ्या काही आजारांना निमंत्रण देऊ शकतं. त्यामुळे या पदार्थांचा वापर अतिशय नियंत्रित आणि तेवढ्या वेळेपुरता करावा.

 

४- च्युर्इंगमदेखील धुम्रपान सोडण्यासाठी मददगार ठरू शकतं. च्युर्इंगममुळे आरोग्यावर काही विपरित परिणाम होत नाहीत, पण याच च्युर्इंगममुळे धुम्रपान करण्याची तुमची लहर कमी होते. ५- चॉकलेटदेखील धुम्रपानाचा तुमचा पिच्छा सोडवू शकतं. यासाठी डार्क चॉकलेट चांगलं मानलं जातं. मिल्क चॉकलेट मात्र धुम्रपान सोडण्यासाठी उपयोगी ठरत नाही, असंही अभ्यासकांचं म्हणणं आहे.एक गोष्ट मात्र पुन्हा लक्षात घ्या, ज्या गोष्टी खाण्याचा सल्ला धुम्रपानापासून मुक्ती मिळवण्यासाठी दिला आहे, त्याचं अतिरेकी सेवन मुळीच करु नका आणि तत्पूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्लाही अवश्य घ्या.