शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वजनच कमी करायचंय ना? मग त्यात काय एवढं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 17:35 IST

‘स्मार्टपणे’ वागलात तर काहीच अशक्य नाही..

ठळक मुद्देआपल्यापुढचे गोल्स, उद्दिष्ट स्मार्ट असू द्या. स्मार्टली ही समस्या सोडवली तर सहजपणे ती सुटेलही.वजन कमी करायचंय.. पण किती? एक किलो, दोन किलो, तीन किलो?.. ते स्पष्टपणे ठरवा.आणखी एक ध्येय समोर ठेवा. लाइफस्टाईल चेंज करायचं. तुमचा निम्म्यापेक्षा अधिक प्रश्न सुटला म्हणून समजा.काटेकोर प्लान तयार करा. हा प्लान शक्यतो तोडला जाणार नाही याकडे कमालीचं लक्ष द्या.

- मयूर पठाडेतुम्हाला वजन कमी करायचंय ना? कशाला मग उगीचंच नमनाला घडाभर पाणी? आणि वजन वाढलंय, ते कमी करायचंय, त्यात लपवण्यासारखंआहे तरी काय?वाढलेलं वजन किंवा वाढू लागलेलं वजन आटोक्यात कसं ठेवायचं हाच आज अनेकांपुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे.वजन वाढलंय हे मान्य करणं ही पहिली पायरी. त्यानंतरच पुढच्या गोष्टी सुरू होतात. वजन वाढीवरची समस्या आटोक्यात आणण्यासाठी आजवर अनेकांकडून अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. काही गोष्टी ऐकूनच सोडून दिल्या असतील. पण आता अशा काही गोष्टी करा, ज्यामुळे तुमचं वजन खरोखरच आटोक्यात राहील आणि तुमच्या आरोग्याचा प्रश्नही सहजासहजी सुटेल.त्याचसाठीच्या या सोप्या टिप्स.वजन कमी करण्यासाठी काय कराल?१- सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपल्यापुढचे गोल्स, उपाय स्मार्ट असू द्या. स्मार्टली ही समस्या सोडवली तर सहजपणे ती सुटेलही. स्मार्ट गोल म्हणजे काय?- आपलं ध्येय टाइमली म्हणजे वेळेशी निगडित ठेवा. त्याशिवाय हे ध्येय सहज, सोपं, साध्य करण्यासारखं, आवाक्यातलं आणि मोजता येणारं हवं.२- कोणतीही गोष्ट हवेत नको. मला वजन कमी करायचंय.. पण किती? एक किलो, दोन किलो, तीन किलो?.. ते स्पष्टपणे ठरवा. अगोदर उद्दिष्ट छोटंच ठेवा. ते पूर्ण झालं की मग पुढचं टारगेट ठेवा.३- किती वजन कमी करायचं हे ध्येय ठेवलं, म्हणजे झालं का? त्यासोबतच आणखी एक ध्येय समोर ठेवा. लाइफस्टाईल चेंज करायचं. एकदा का तुम्ही लाईफस्टाईल सेट केलीत तर तुमचा निम्म्यापेक्षा अधिक प्रश्न सुटला म्हणून समजा. ही लाईफस्टाईल तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत सहज घेऊन जाईल.४- त्यासाठीचा काटेकोर प्लान तयार करा. हा प्लान शक्यतो तोडला जाणार नाही याकडे कमालीचं लक्ष द्या.सुरुवातीला या गोष्टी तर करा. बघा, तुमचं वजन बºयापैकी आटोक्यात आलेलं असेल. त्यानंतर काय करायचं, तेही लगेच कळेल.. त्यासाठी थोडंसं थांबा..