- मयूर पठाडेपावसाळ्यात केव्हाही पाहा, डॉक्टरांचे, विशेषत: लहान मुलांच्या डॉक्टरांचे दवाखाने खचाखच भरलेले असतात आणि मुलंही विविध दुखण्यांनी त्रस्त असतात. सर्दी, खोकला, थंडी, ताप, संसर्गजन्य आजार..पावसाळ्याच्या दिवसांतल्या गर्दीमुळे डॉकटरांचे खिसे भरले जात असले तरी लहान मुलांना मात्र त्यांच्या आजारांचा खूपच त्रास होतो. पावसाळ्याचा हा त्रास लहान मुलांनाच नव्हे, तर मोठ्या माणसांनाही होतो.अनेकदा आजार आपल्या शरीरात घर करतात, ते आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा एक उत्तम उपाय आहे, तो म्हणजे क जीवनसत्त्व. रोज तुमच्या आहारात क जिवनसत्त्वाचा समावेश असलाच पाहिजे.पण यासंदर्भातही काही नियम पाळले पाहिजेत. क जीवनसत्त्वांमुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते म्हणून खात सुटा क जीवनसत्त्वयुक्त पदार्थ असं नाही.सी व्हिटॅमिन रोज खाणं गरजेचं आहे, कारण ते तुमच्या शरीरात तयार होत नाही. तुम्हाला ते बाहेरुनच मिळवावं लागतं.मात्र यासंदर्भात डॉक्टरांनी आणि संशोधकांनी सावधानतेचा इशाराही दिला आहे.
मुलांना रोज ५०० मिलिग्रॅम 'सी' व्हिटॅमिन मिळाले, तरच त्यांची तब्येत राहील उत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 18:35 IST
पावसाळ्यांतले आजार होतील दूर. मात्र कुठल्याही परिस्थितीत मुलांना रोज १००० मिलिग्रॅमपेक्षा जास्त सी व्हिटॅमिन देऊ नका..
मुलांना रोज ५०० मिलिग्रॅम 'सी' व्हिटॅमिन मिळाले, तरच त्यांची तब्येत राहील उत्तम
ठळक मुद्देमुलांच्या आहारात रोज ५०० मिलिग्रॅम क जीवनसत्त्व हवेमात्र १००० मिलिग्रॅमपेक्षा ते कुठल्याही परिस्थितीत जास्त नको.रोगप्रतिकारक शक्ती वाढतेविविध आजारांना अटकाव