शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विद्या बालन म्हणते, राग आवरला मात्र अ‍ॅसिडीटी वाढली!

By admin | Updated: May 26, 2017 19:02 IST

आपल्याला नक्की कशानं अ‍ॅसिडीटी होते, हे आपण कधी शोधतो का?

- नितांत महाजन‘मला प्रचंड राग यायचा, एकेकाळी तर खूप यायचा. पण करिअरच्या सुरुवातीला लोकांशी जुळवून घेण्याच्या काळात, लोकांनी आपल्याला स्वीकारावं, आपलं काम आवडावं म्हणून झगडण्याच्या काळात मी तो राग दाबला. मनातल्या मनातच ठेवला. पण त्या काळात मला अ‍ॅसिडीटीचा प्रचंड त्रास झाला. -अलिकडेच एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने हे सांगितलं. यश-अपयश स्वीकारण्याच्या, हाताळण्याच्या आपल्या प्रवासाबद्दल ती बोलत होती. आणि ते वाचताना वाटतं की, आपलं तरी दुसरं काय होतं? आपल्यापैकी अनेकांना अ‍ॅसिडीटीचा त्रास होतो. प्रचंड त्रास होतो. छातीत जळजळ, मळमळ, नॉशिया, भूक लागत नाही, उलट्या होतात, पोटात दुखतं, डोकं दुखतं असे किती प्रकार. आपणही तात्पुरते अ‍ॅण्टासिड औषधं घेवून ते सारं दाबून टाकतो. किंवा फार्फार तर गार दूध पिवून त्रास कमी होईल असं पाहतो. पण तरी अ‍ॅसिडीटी काही पाठ सोडत नाही. इतरांना तो आजार गंभीर वाटत नाही, पण आपल्याला होणारा त्रास आपणच जाणून असतो.त्यावेळी काय करायचं?विद्या म्हणते तसं आपल्या अ‍ॅसिडीटीचं मूळ शोधलं पाहिजे. ते मूळ शोधलं तर ते कारण वजा करुन आपल्याला आपल्या अ‍ॅसिडीटीला कण्ट्रो करता येवू शकतं.१) आपला स्वभाव चिडचिडा आहे का?आपण खूप चिडचिडे असू, राग येत असेल तरी अ‍ॅसिडीटी वाढते. आणि आपली अ‍ॅसिडीटी वाढली तरी आपल्याला खूप राग येतो. हे चक्र आहे.२) वेळी अवेळी जेवण?आपण कधीही जेवतो, दोन जेवणात खूप अंतर असतं का? अती जेवतो का? तसं असेल तरी अ‍ॅसिडीटी होते.३) मसालेदार खाणं?अती मसालेदार, चमचमीत खाण्यानं, जंक फूड, सोडायुक्त पेय यासाऱ्यानंही अ‍ॅसिडीटी वाढते.४) व्यायामाचा अभाव?काहीच व्यायाम नाही, बैठं काम. खाणं चिक्कार, सतत खाणं, हालचाल शून्य, अ‍ॅसिडीटी होणारच.५) मनात कुढणं?आपण मनातल्या मनात फार कुढत असलो, मनमोकळं केलं नाही, सतत मनात जळफळत असलो तरी आपलं पित्त खवळतं.६) यापैकी एक किंवा यासाऱ्या कारणांचा एकत्रित परिणाम म्हणजे आपलं खवळलेलं पित्त. त्याचं कारण कळलं तर ते कारण नष्ट करून किंवा कमी करुन आपलं पित्त आटोक्यात ठेवता येतं.