शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
6
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
7
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
8
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
9
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
10
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
11
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
12
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
13
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
14
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
15
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
16
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
17
Ladki Bahin Yojana: अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
18
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
19
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
20
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR

इन्स्टाग्राम वापरताय? तरुणांच्या, विशेषत: तरुणींच्या मानसिक आरोग्यावर विपरित परिणाम होण्याचा धोका

By admin | Updated: May 26, 2017 17:02 IST

यूट्यूबचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट, तर इन्स्टाग्राममुळे ‘फोमो’ मागे लागण्याची भीती..

- मयूर पठाडेसोशल मिडीयाच्या कुठल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही आहात? फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, स्रॅपचॅट, यूट्यूब? कदाचित सगळ्याच प्लॅटफॉर्मवर तुम्ही असाल? पण यातल्या कुठल्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही जास्त वापर करता?रोज दोन तासापेक्षा जास्त वेळ तुम्ही सोशल मिडीयावर घालवत असाल, तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी घातक आहेच, पण इन्स्टाग्राम हे तरुणांच्या त्यातही तरुणींच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. नुकत्याच झालेल्या नव्या अभ्यासाचा हा निष्कर्ष आहे. इंग्लंडच्या ‘रॉयल सोसायटी फॉर पब्लिक हेल्थ’ या सोसायटीने १४ ते २३ वयोगटातील मुलामलींच्या सोशल नेटवर्किंग सवयींचा अभ्यास केला. त्यांच्यातली चिंता, नैराश्य आणि स्वशरीराविषयी त्यांची प्रतिमा.. अशा अनेक गोष्टींचा त्यात बारकाईनं अभ्यास करण्यात आला. इन्स्टाग्राम सर्वात घातक,तर युट्यूब सकारात्मक

संशोधकांच्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, या सगळ्या सोशल नेटवर्किंग साईटपैकी तरुणांच्या मानसिक आरोग्यावर इन्स्टाग्रामचा तरुणांवर, त्यातही तरुणींच्या मानसिक आरोग्यावर खूपच विपरित परिणाम होतो. त्यामुळे इन्स्टाग्रामचा जर तुम्ह्ी अतिरेकी वापर करीत असाल, तर त्यापासून सावध राहा. त्याच वेळी यूट्यूबचा मात्र तरुणांच्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम होतो, असंही हे संशोधन सांगतं.काय आहे इन्स्टाग्राम?फोटो, व्हीडीओ शेअर करणे, एडिट करणे, त्यात क्रिएटिव्ह बदल करणे आणि आपल्या मित्र मैत्रिणींना, सार्वजनिकरित्या किंवा त्यांच्या खाजगी अकाऊंटवर पाठवण्यासाठी तरुणांमध्ये सध्या सर्वाधिक पॉप्युलर असलेले मोबाईल अ‍ॅप आहे.या अ‍ॅपद्वारे फोटोंमध्ये आपल्याला हवे ते बदल करून दुसऱ्याला पाठवता येतात. जगभरात जवळपास ७० कोटीपेक्षाही अधिक लोक, विशेषत: तरुण हे अ‍ॅप वापरतात.इन्स्टाग्रामचे दुष्परिणाम

इन्स्टाग्राममध्ये तुमचे फोटो एडिट, फिल्टर करण्याची आणि आपण आहोत, त्यापेक्षा अधिक सुंदर करून पाठवण्याची सोय असल्याने त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. त्यामुळे जे तरुण, विशेषत: तरुणी इन्स्टाग्रामवरचे हे अनरिअलिस्टिक, ‘खोटे’, ‘नकली’ फोटो पाहतात, तेव्हा त्यांना स्वत:च्या बॉडी आणि शरीराविषयी खूपच गिल्ट वाटायला लागतो. आपण दिसायला कुरूप आहोत, इतर तरुणी मात्र आपल्या तुलनेत खूपच सुंदर आहेत अशी नकारात्मक मानसिकता त्यांच्या मनात तयार होते. त्यामुळे त्यांच्यात नैराश्य येऊ शकतं. इन्स्टाग्राममुळे आपल्याच शरीराविषयी आपल्या मनात नकारात्मक भावना तयार होते, आपल्या झोपेचा पॅटर्न बिघडतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सेन्स आॅफ ‘फोमो’ (फिअर आॅफ मिसिंग आऊट’ वाढीला लागतो...त्यामुळे संशोधकांनी इशारा दिला आहे की, इन्स्टाग्रामच्या अति वापरापासून दूर राहा, वस्तुस्थिती समजून घ्या आणि नकारात्मक मानसिकतेला बळी पडू नका. संशोधक म्हणतात, त्यासाठी इन्स्टाग्रामवरील ‘फोटोशॉप’ किंवा फिल्टरवर बंदी आणावी असं आमचं म्हणणं नाही, पण हे फोटो खरे नाहीत, हे लोकांना कळावं यासाठी निदान त्यांना सजग तरी करायला हवं.