शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

दोनतृतीयांश बाळांना जन्मतःच जडतो मूत्रपिंडाचा विकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2022 09:52 IST

तज्ज्ञांनी दिली माहिती : दुर्लक्ष केल्यास होतात गंभीर परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दोनतृतीयांश मुलांना जन्मत: किडनी, मूत्रमार्गाची विकृती आदी विकार असतात. या विकारांमध्ये प्रामुख्याने मूत्रमार्गात अडथळा (ऑब्स्ट्रक्टिव्ह नेफ्रोपॅथी) व उलट दिशेने मूत्रप्रवाह (रिफ्लेक्स नेफ्रोपॅथी) यांचा समावेश असतो, अशी माहिती मूत्रपिंड विकार तज्ज्ञांनी दिली. 

जगभरात १० मार्च हा दिवस जागतिक मूत्रपिंड दिवस म्हणून पाळला जातो. ‘किडनी हेल्थ फॉर ऑल’ हे या वर्षाचे घोषवाक्य आहे. याबाबत मूत्रपिंड विकारतज्ज्ञ डॉ. रमेश सोहोनी यांनी सांगितले की,  लहान मुलांचे मूत्रपिंड विकसित अवस्थेत असते. त्यामुळे त्यांच्या विकारांकडे दुर्लक्ष केल्यास आजीवन डायलेलिस, किडनी प्रत्यारोपण, उच्च रक्तदाब, मल्टिऑरगन फेल्युअर, ॲनिमियासारख्या विकारांचा सामना करावा लागतो. मात्र, वेळेत निदान आणि योग्य उपचार केल्याने दीर्घकालीन मूत्रमार्गाच्या विकारांपासून वाचविता येते. काही आजार जन्मजात दोषांमुळे होतात, तर बरेचसे आजार विविध कारणांमुळे होऊ शकतात. मूत्रपिंडामध्ये छोट्या फुग्यासारखा पिशव्या म्हणजे मल्टिपल सिस्टस तयार होणे, अशा अनेक प्रकारचे मूत्रपिंड आणि मूत्रमार्ग यात दोष आढळतात. यापैकी शस्त्रक्रियेने काही दोष दूर करता येतात. तर, काहींमुळे मूत्रपिंडाचे कार्य मंदावते, असे म्हणाले.

लक्षणे दिसताच उपाययोजना करणे आवश्यक nमूत्रपिंड व मूत्रमार्गात जंतू संसर्गामुळे होणाऱ्या रोगांचे प्रमाण जास्त आहे. विशेषत: स्त्रियांमध्ये योनीमार्ग, मूत्रमार्ग आणि शौचमार्ग एकमेकांच्या जवळ असल्यामुळे मूत्राशयाच्या आणि खालील मूत्रमार्गाच्या अर्थात आजारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त आढळते. nमूत्रमार्ग आणि शौच मार्गाची स्वच्छता राखणे, हवामानाला अनुसरून योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करणे, जास्त वेळ लघवी थांबवून न ठेवता लघवीचा निचरा करणे, काही लक्षणे दिसल्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे.