शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

​‘या’ सेलिब्रिटींचेही ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले आहे निधन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 13:50 IST

बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील असे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांचेदेखील ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...

-रवींद्र मोरे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा जवळचा मित्र आणि अभिनेता इंदरकुमार यांचे नुकतेच ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ४५ व्या वर्षी चार बंगला इथल्या निवासस्थानी निधन झाले. बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रात असे काही प्रसिद्ध व्यक्ती आहेत ज्यांचेदेखील ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. जाणून घेऊया त्यांच्याबाबत...* रिमा लागू बॉलिवूडची आई म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री रिमा लागू यांचेही निधन १८ मे २०१७ रोजी कार्डियक अरेस्टने झाले होते.  * संजीव कुमारबॉलिवूड अभिनेता संजीव कुमार यांचा जन्म ९ जुलै १९३८ रोजी झाला होता. वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांचे निधन ह्रदयविकाराच्या झटक्याने ६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले होते.  * नवीन निश्चलबॉलिवूड अभिनेता नवीन निश्चल यांचे निधन ६४ व्या वर्षी १९ मार्च २०११ रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते.  * विनोद मेहराबॉलिवूड अभिनेता विनोद मेहरा यांचे निधन ३० आॅक्टोबर १९९० रोजी ४५ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते. * देव आनंदबॉलिवूडचे सदाबहार हिरो देव आनंद यांचे निधन ३ डिसेंबर २०११ रोजी ८८ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते. ते त्यावेळी वॉशिंग्टन मेफेयर हॉटेलच्या खोलीत होते. * ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती !* माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचे निधन २७ जुलै २०१५ रोजी इंडियन इंस्टीट्यूट आॅफ मॅनेजमेंटमध्ये लेक्चर देत असताना ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते. * पं. जवाहर लाल नेहरूभारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहर लाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला होता. त्यांचे निधन वयाच्या ७५ व्या वर्षी ह्रदयविकारच्या झटक्याने २७ मे १९६४ रोजी झाले होते.  * जयललितातामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन ६८ व्या वर्षी कार्डियक अरेस्टमुळे ५ डिसेंबर २०१६ रोजी झाले होते.     * मदर टेरेसानोबल आणि भारत रत्न पुरस्काराने सन्मानित झालेल्या मदर तेरेसा यांचा जन्म २६ आॅगस्ट १९१० रोजी झाला होता. त्यांचे निधन ८७ व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले होते.