शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

केसांच्या वाढीसाठी ही आहेत सात उपयुक्त नैसर्गिक उत्पादने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 02:18 IST

गळणारे केस तुमचा आत्मविश्वास गमावण्यामागील एक प्रमुख कारण ठरू शकते. सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण आणि केसांसाठी मिळणा-या रसायनयुक्त उत्पादनांना याचा दोष दिला जाऊ शकतो.

गळणारे केस तुमचा आत्मविश्वास गमावण्यामागील एक प्रमुख कारण ठरू शकते. सध्याची धावपळीची जीवनशैली, प्रदूषण आणि केसांसाठी मिळणा-या रसायनयुक्त उत्पादनांना याचा दोष दिला जाऊ शकतो. त्यामुळे या महागड्या, रसायनयुक्त उत्पादनांपासून दूर जाऊन नैसर्गिक उपचारांचे स्वागत केले, तर या समस्येवर मात करू शकतो. हे उपाय परिणामकारक, सुरक्षित आणि सुलभ असून, त्यात रसायने आणि प्रिझर्व्हेटिव्हज् मिसळलेले नाहीत.आवळा : हा नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढविणारा असून, यात मोठ्या प्रमाणात आवश्यक फॅटी अ‍ॅसिड्स असतात. तो केसांची मुळे अधिक शक्तिशाली करून त्यांना ताकद आणि चमक मिळवून देतो. आवळ्यात आयर्न, अँटिआॅक्सिडंट्स (जसे एलॅजिक, गॅलिक अ‍ॅसिड) आणि कॅरोटिन असतात. त्यामुळे केसातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे डोक्यावरचा कोंडाही कमी होतो.

रोझमेरी : यातील वेदनाशामक घटक असलेल्या कानोसीलमुळे हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते. त्यामुळे केसांच्या बीजकोषांची वाढ होते आणि केसवाढीला चालना मिळते. केस गळण्याची समस्याही दूर होते.

नारळ : केसवाढीला अडथळा आणणाºया फ्री रॅडिकलला रोखले जाऊ शकते. त्याशिवाय केस चमकदार आणि काळेभोर राहण्यासाठी नारळ उपयुक्त ठरतो.जोजोबा - यात शीतज्वर गुणवत्ता असल्यामुळे केसांखालील त्वचेला मऊपणा आणि कोमलता मिळते. त्याशिवाय मृत त्वचा, कोंडा, अस्वच्छतेपासून सुटका करून डोक्याची त्वचा स्वच्छ आणि आर्द्र ठेवतो. जोजोबाची परिणामकारकता प्राचीनकाळापासून अवगत असून, याचा वापर जगभरात अनेक औषधांमध्ये केला जातो.लॅव्हेंडर : लॅव्हेंडरमध्ये लिनालूल आणि लिनालिल अँसिटेट असतात. केसांच्या बीजकोषांत ते खोलवर जाऊन एक सुरक्षित उष्ण स्तर तयार करते. त्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात आणि बीजकोषांच्या वाढीला चांगली चालना प्राप्त होते.

ज्युनिपर : हे तेल केसांची मुळे मजबूत करून वाढीला चालना देते. यात असलेल्या जीवाणूविरोधी गुणधर्मामुळे डोक्यावरीलत्वचेवर पुरळ तयार करणाºया जीवाणूंची वाढ थांबविते आणि पुरळ रोखते.

कॅस्टर : कॅस्टर आॅइल केसांची गळती रोखण्यासाठी वापरले जाते. ते प्रोटिन, मिनरल्स आणि जीवनसत्त्व ‘ई’ने समृद्ध आहे. दुभंगलेल्या केसांसाठीही ते उपयुक्त ठरते.- अमित सारडा,वेलनेस अँड ब्युटी एक्स्पर्ट