शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

..टेन्शनचीच लक्षणं आहेत ही, आजार नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 16:05 IST

डाग, हिरड्यांतून रक्त, खाज, खा खा, पोटदुखी.. यासारखं काही तुम्हाला होतंय?

ठळक मुद्देएखाद्या दिवशी अचानक आपल्या चेहऱ्यावर डाग, पुरळ, फोड उमटतात.. सततच्या टेन्शननी तुमच्या चेहऱ्यावर घेतलेलं हे रुप असू शकतंं.कधीतरी अचानक हिरड्यांतून रक्त यायला लागतं.. तुम्ही सध्या फारच तणावात असल्याची जाणीव या हिरड्यांनी तुम्हाला करून दिलेली असू शकते.कधीकधी गोड किंवा जंकफूड खाल्ल्याशिवाय स्वस्थच बसवत नाही. टेन्शनमुळेही असं होऊ शकतं.

- मयूर पठाडेसगळं काही व्यवस्थित सुरू आहे. कसला म्हणजे कसला त्रास नाही. रोजचं कामाचं झेंगट मागे आहे, त्याच्यासाठी तर मरमर करावीच लागते, पण शारीरिक असं एकही दुखणं नाही. अधेमधे केव्हा काही तपासण्या केल्या असतील, तर त्याही सगळ्या नॉर्मल आलेल्या आहेत.. तरीही कधीतरी अचानक काहीतरी वेगळंच घडतं.. तेही फार काही सिरिअस असतं अशातला भाग नाही, पण ती तुमच्यासाठी धोक्याची घंटा असते. वेळीच लक्ष देण्यासाठी. नाहीतर मग त्याचा भस्मासूर व्हायला वेळ लागत नाही. ही जी लक्षणं, जे संकेत आपल्याला दिसतात, त्याचा अर्थ आपल्याला अगोदरच माहीत असला तर मग त्याकडे जरा लक्षही देता येतं.त्यासाठीच ही लक्षणं जरा समजून घेतली पाहिजेत. मुख्यत: ही लक्षणं असतात टेन्शनची, ताण-तणावाची, पण वेगळ्याच रुपात ती आपल्यासमोर येऊन उभी राहातात.. आपणही बºयाचदा त्याकडे दुर्लक्ष करतो, पण हे दुर्लक्ष महागात पडू शकतं. त्यामुळे जाणून घ्या आपल्यातल्या तणावाची ही लक्षणं..ही आजाराची नव्हेत, तणावाची लक्षणं आहेत..१- एखाद्या दिवशी अचानक आपल्या चेहºयावर डाग दिसायला लागतात, चेहºयावर पुरळ, फोड उमटतात.. आपण काहीतरी थातूरमातूर घरगुती उपचार करतो, नाहीतर सोडून देतो.. जाईल आपोआप म्हणून.. पण सततच्या टेन्शननी तुमच्या चेहºयावर घेतलेलं हे रुप असू शकतं, हे लक्षात घ्यायला हवं.२- कधीतरी अचानक हिरड्यांतून रक्त यायला लागतं.. आजपर्यंत कधीच हा त्रास नव्हता, पण आज असं कसं काय?.. अगोदरचा काहीही त्रास नसताना.. आश्चर्य व्यक्त करून किंवा एखादी गुळणी करून तुम्ही गप्प बसता.. पण ही गप्प बसण्याची गोष्ट नाही. तुम्ही सध्या फारच तणावात असल्याची जाणीव या हिरड्यांनी तुम्हाला करून दिलेली असू शकते.३- कधीकधी काही जणांना काही गोष्टी खाण्याचे जणू डोहाळे लागतात. त्यातही गोड किंवा जंकफूड.. त्याशिवाय स्वस्थच बसवत नाही. सारखी खा खा होते आणि या गोष्टी मग आपोआप तोंडात ढकलल्या जातात. त्याची मग सवयच होऊन जाते आणि एखाद्या जागी बसलं की मग काही ना काही बोकाणा तोंडात भरणं सुरू होतं.. हे तुम्ही जाणीवपूर्वक करता असं नाही, तुमच्यातलं टेन्शन हे तुमच्याकडून करवून घेतं. बघा, तुम्ही खरंच टेन्शनमध्ये आहात का?४- स्किनलाही आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता, पण गेल्या काही दिवसांपासून अंगाला अचानक खाज यायला लागली आहे. त्यामुळे अस्वस्थही होतंय, पण ही खाज स्किनमधल्या प्रॉब्लेममुळे नव्हे, तर टेन्शननी तुम्हाला दिलेली सूचना असू शकते.५- पोटदुखीचा तर अनेकांना त्रास असतो. त्यावर काहीबाही उपचारही आपण घेतो, पण काहीही फरक पडत नाही. तेवढ्यापुरेसं बरं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या. असं जर असेल, तर अगोदर आपलं टेन्शन थोडं कमी करा. निवांत व्हा. सुटी घ्या.. आणि पाहा.. तुमची पोटदुखी दूर पळालेली असू शकते. कारण ही पोटदुखी अरबट चरबट खाण्यामुळे नाही, तर तुमच्या कामाच्या रगाड्यानं तुम्हाला दिलेली भेट असू शकते..तेव्हा या छोट्या छोट्या गोष्टींकडे द्या लक्ष. ऐका त्यांचं म्हणणं आणि व्हा निश्चिंत..