शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही सदैव आशावादी असता का? आयुष्य वाढते; तणावातही होते उत्तम काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 07:49 IST

अमेरिकेतील पाहणीचा निष्कर्ष; आशावादी व्यक्ती तणावमुक्त राहण्यासाठी वायफळ चर्चेत वेळ घालवत नाहीत. अडचणी आल्या तरी अशा व्यक्ती पटकन चिडत नाहीत. या व्यक्ती आयुष्यात रिस्क घेण्यासाठी तयार असतात. त्यांच्यातील सकारात्मकता सातत्याने वाढते, असे या पाहणीत दिसून आले आहे.

वाॅशिंग्टन : नेहमी आशावादी राहा, आयुष्य वाढेल, असा निष्कर्ष अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीतून काढण्यात आला आहे. माणूस आशावादी असल्यास तो कितीही तणावाच्या स्थितीत अतिशय उत्तम काम करू शकतो, असेही या पाहणीतून आढळले आहे.

अमेरिकन व्हेटर्न्स अफेअर्स या संस्थेच्या वतीने या पाहणीची सुरुवात १९६० च्या दशकात झाली. त्यात २३३ युवकांना सहभागी करून घेण्यात आले. त्यांची मनोवस्था तसेच ते कोणत्या तणावाच्या स्थितीत आहेत, याची अतिशय माहिती घेण्यात आली. ही पाहणी सुमारे चार दशके सुरू होती. त्यातील सहभागी लोकांशी विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा संपर्क साधण्यात आला. त्यावेळी त्यांची मानसिक व शारीरिक स्थिती कशी आहे, याची माहिती घेण्यात आली.

१९८०-९० च्या दशकामध्ये या २३३ जणांमध्ये किती लोकांनी आपला आशावाद टिकवून ठेवला आहे, हेही तपासण्यात आले. आशावादी राहिल्याने त्यांच्या कार्यशैलीत किती फरक पडला, ते आपले आयुष्य किती आनंदाने जगत आहेत, त्यांना या काळात काही विकार जडले का, याबद्दलही त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले. या पाहणीच्या पुढच्या टप्प्यात २००२ ते २०१० या कालावधीत सहभागी लोकांच्या शारीरिक स्वास्थ्याबद्दल पुन्हा माहिती घेण्यात आली.त्यातून असे लक्षात आले की, आपल्याला उद्या चांगले दिवस येतील, अशी आशा ज्यांनी मनात जिवंत ठेवली, त्यांनी खूप तणावाच्या स्थितीतही अतिशय उत्तम काम केले. असे लोक कमी आजारी पडले. मात्र, ज्यांच्या मनातील आशावाद कोमेजला होता, अशा व्यक्तींना वयाच्या चाळिशी, पन्नाशीमध्येच एकापेक्षा जास्त व्याधी जडल्या होत्या. (वृत्तसंस्था) 

रिस्क घेण्यासाठी असतात सदैव तयारआशावादी व्यक्ती तणावमुक्त राहण्यासाठी वायफळ चर्चेत वेळ घालवत नाहीत. अडचणी आल्या तरी अशा व्यक्ती पटकन चिडत नाहीत. या व्यक्ती आयुष्यात रिस्क घेण्यासाठी तयार असतात. त्यांच्यातील सकारात्मकता सातत्याने वाढते, असे या पाहणीत दिसून आले आहे.

टॅग्स :Lifestyleलाइफस्टाइल