शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पायाच्या तळव्यांची अशी घ्या काळजी

By admin | Updated: July 13, 2017 02:20 IST

बदलती जीवनशैली, आहार, ताणतणाव यामुळे माणूस अक्षरश: घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावू लागला आहे

- रीना चव्हाणसुंदर दिसावे, ही प्रत्येकाची इच्छा असते; पण बदलती जीवनशैली, आहार, ताणतणाव यामुळे माणूस अक्षरश: घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावू लागला आहे. या धावपळीच्या आयुष्यामुळे त्याला स्वत:कडे लक्ष द्यायलाही वेळ नाही. त्यातल्या त्यात वेळ काढून काही जणी ब्युटी पार्लरमध्ये जातात. चेहऱ्याची काळजी घेतात; पण पायांकडे आपण नेहमीच दुर्लक्ष करतो. विशेषत: पावसाळ्यात पाण्यामुळे पायांना भेगा पडणे, खाज येणे, अशा समस्यांना समोरे जावे लागते. पायाच्या तळव्यांची काळजी कशी घ्यावी, याबाबत जाणून घेऊ या.बऱ्याच गृहिणी पायाच्या तळव्यांकडे दुर्लक्ष करतात. पायात चप्पल न वापरताच चालण्याने, सतत पाण्यात काम करण्याने तळवे खराब होऊन त्याला भेगा पडतात. बऱ्याचदा तर त्यातून रक्तसुद्धा येते. अशा वेळी उभे राहणे व चालणे अशक्य होते. त्यामुळे वेळीच पायाची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. पायाचे तळवे स्वच्छ करून त्याची मालिश न केल्याने त्वचेला आवश्यक तेवढे आॅक्सिजन आणि रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे चेहऱ्यावरील चमकसुद्धा कमी होते. तळवे स्वच्छ केल्याने त्याची निगा राखल्याने रक्तप्रवाह वाढून आॅक्सिजनचाही पुरवठाही चांगल्या प्रकारे होतो. दररोजच्या धावपळीमुळे वा कामाच्या दगदगीमुळे तळव्यांची विशेष काळजी घ्यायला जमत नसेल, तर निदान अंघोळीच्या वेळी तरी तळवे ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करा. अंघोळ झाल्यानंतर तळव्यांना खोबऱ्याच्या तेलाने मालिश करा, जेणेकरून शरीरात रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होईल. घरगुती उपायांद्वारे पायांची योग्य ती काळजी घेता येईल.>पायाची स्वच्छता कशी करावीस्क्रबिंग करा : भेगा पडलेल्या तळाव्यांना स्क्रबिंग केल्याने तळव्यांची डेडस्कीन जाऊन ते मुलायम होतात. स्क्रब करण्यापूर्वी पाय थोडा वेळ गरम पाण्यात ठेवावेत.खोबरेल तेल : घरगुती उपचार करायचे झाल्यास भेगा आणि रुक्ष तळव्यांना खोबऱ्याचे तेल लावावे. तळव्यांचा मुलायमपणा याने कायम राहतो. तसेच जंतूंच्या संक्रमणापासूनही तळवे सुरक्षित राहतात.ग्लिसरीन : भेगा पडलेल्या तळव्यांसाठी ग्लिसरीन कोणत्याही वरदानाशिवाय कमी नाही. दररोज रात्री झोपताना ग्लिसरीन लावल्याने भेगा लवकर ठीक होतात. लिंबूमुळेसुद्धा डेडस्कीन जाऊन त्वचा मुलायम होते.