शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गर्भावस्थेत ही घ्या काळजी.. तरच जन्माला येणारं बाळ असेल निरोगी आणि गुटगुटीत..

By admin | Updated: May 31, 2017 17:59 IST

घरात पाळणा हलण्यापूर्वीच व्हा टेन्शन फ्री.. आई आणि बाबांसाठी या सात टिप्स..

- मयूर पठाडेगुटगुटित, हसरं, खेळतं, निरोगी बाळ पाहिलं की आपल्यालाही कसं प्रसन्न वाटतं ना? पण असं बाळ जर आपल्याला हवं असेल तर ते संपूर्णत: आईवरच अवलंबून असतं. गर्भावस्थेत आईनं जर स्वत:ची नीट काळजी घेतली, आपल्या खाण्यापिण्याकडे आणि स्वास्थ्याकडे नीट लक्ष दिलं तर होणारं बाळही गुटगुटीत निपजतं, हे साऱ्यांनाच माहीत आहे, पण गर्भावस्थेच्या काळात आईच टेन्शनमध्ये असेल, वेगवेगळ्या काळज्यांनी तिला पोखरलेलं असेल तर जन्माला येणारं बाळही विकृती; विशेषत: मानसिक विकृती घेऊन जन्माला येऊ शकतं..शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात हे सिद्ध झालं आहे. त्यामुळे आई होऊ इच्छिणाऱ्या आणि गर्भवती स्त्रियांना सावधानतेचा इशारा देताना त्यांनी सांगितलं आहे, गर्भावस्थेच्या काळात आनंदी राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. कुठलंही टेन्शन घेऊ नका. या काळातील आईच्या शरीरिक आरोग्याचा जसा जन्माला येणाऱ्या बाळावर परिणाम होतो, तसाच मानसिक आरोग्याचाही.

 

आईनं (आणि त्यासाठी अर्थातच बाबानंही) जर ही काळजी घेतली नाही, तर भविष्यात बाळाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. बाळाची वाढ खुंटू शकते. गर्भावस्थेत आईवर असलेला मानसिक ताण, टेन्शन जर थोड्या काळापुरतं असेल तर ठीक, पण सातत्यपूर्ण आणि जास्त कालावधीपर्यंत आई जर तणावात असेल त्यानुसार आईच्या शरीरातही बदल होतात. आईच्या टेन्शनचा बाळावर काय परिणाम होतो?

 

१- आईच्या गर्भात भू्रण आवरण द्रव असतो. हा द्रव म्हणजे पोटात वाढणाऱ्या बाळासाठी एक प्रकारचं कुशन असतं. हा द्रव म्हणजे आई आणि बाळ यांच्यातील प्रमुख दुवा असतो. २- आईच्या शरीरातील पौष्टिक पदार्थ, पाणी, जैविक घटक यांचं आदानप्रदान करण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम या द्रवाद्वारे होत असतं. आई टेन्शनमध्ये असेल तर या द्रवात असलेल्या स्ट्रेस हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते, जे बाळाच्या आरोग्यासाठी घातक आहे.३- त्यामुळे जन्माला येण्यापूर्वीच बाळाच्या मेंदूच्या वाढीत अडथळे येऊ शकतात.४- आईच्या ताणामुळे जन्माला येणाऱ्या बाळाची भविष्यातील वाढही खुंटलेली असू शकते. ५- लक्ष एकाग्र करण्याची बाळाची क्षमता त्यामुळे अविकसित राहू शकते.६- बाळाला हृदयविकाराचा त्रास भविष्यात होऊ शकतो.७- जन्माला येणारं बाळ तडतडं, चिडचिडं आणि हायपरअ‍ॅक्टिव्ह असू शकतं.