स्वाईन फ्लू फक्त बैठकीपुरतेच गंभीर (जोड बॉक्स)
By admin | Updated: February 10, 2015 00:56 IST
बॉक्स...
स्वाईन फ्लू फक्त बैठकीपुरतेच गंभीर (जोड बॉक्स)
बॉक्स...-वैज्ञानिक विश्लेषणाची गरज मेडिकलमध्ये आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून, १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये २८ महिला आहेत तर १२ पुरुष आहेत. तज्ज्ञांच्या मते महिलामंध्ये स्वाईन फ्लू वाढण्याला घेऊन वैज्ञानिक विश्लेषण होण्याची गरज आहे. सोबतच मृतांमध्ये ३० वर्षांखालील चार रुग्णांचा, ३० ते ४० वर्षांतील चार रुग्णांचा तर ५० ते ६० वर्षांतील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वयाच्या चाळीशीपर्यंत मनुष्याची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहत असतानाही सर्वात जास्त याच वयाच्या आतील रुग्णांचा मृत्यू झाल्याने याविषयीही विश्लेषण होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.