दुर्बिणीतून शस्त्रक्रिया उपयुक्त
By admin | Updated: July 31, 2015 22:25 IST
दुर्बिणीतून शस्त्रक्रिया उपयुक्त
दुर्बिणीतून शस्त्रक्रिया उपयुक्त
दुर्बिणीतून शस्त्रक्रिया उपयुक्त -लेप्रोस्कोपिक सर्जन संघटना : मेडिकलमध्ये तीन दिवसीय परिषदेला सुरुवात(फोटो आहे...)नागपूर : पोट उघडून (ओपन) केलेल्या शस्त्रक्रियानंतरही रुग्णाला बऱ्याच वेदना सहन कराव्या लागायच्या. जखमा भरून यायला वेळ लागायचा, परिणामी हॉस्पिटलमध्ये जास्त दिवस राहावं लागायचं. याऊलट दुबिर्णीच्या साहाय्याने ऑपरेशनमध्ये कट्स कमी असल्यामुळे वेदना कमी होतात. रु ग्ण लवकर घरी जाऊन काही दिवसांतच आपल्या कामाला पूवीर्प्रमाणे जाऊ शकतो. यामुळे ही सर्जरी उपयुक्त ठरत आहे. तांत्रिकदृष्ट्या यात होत असलेल्या बदलांवर माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी लेप्रोस्कोपिक सर्जन संघटनेच्यावतीने राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रसिद्ध लेप्रोस्कोपिक सर्जन व मेडिकलच्या शल्यशास्त्रविभागाचे विभाग प्रमुख डॉ. राज गजभिये यांन दिली. तीन दिवस आयोजित या परिषदेचे उद्घाटन गुरुवारी झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. परिषदेचे उद्घाटन मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉ. राज गजभिये, डॉ. कुरेशी, डॉ. अभय दळवी, डॉ. राजेश खजुल्लवार, छत्तीसगडचे डॉ. संदीप दवे उपस्थित होते. दुर्बिणद्वारे (लेप्रोस्कोपी) करण्याचे प्रमाण ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी केले. लेप्रोस्कोपिक सर्जरी म्हणजे, शरीरावर मोठे कट्स न देता केवळ दोन ते तीन लहान कट्स देऊन दुर्बिणीच्या साहाय्याने केलेली शस्त्रक्रिया. हे कट्स एक ते तीन सेंटिमीटरचे असू शकतात. या छिद्रातून अत्यंत छोटा पण अतिप्रगत असणारा कॅमेरा नळीच्या आधारे पोटात सोडला जातो. पोटातील आतील दृश्य बघून डॉक्टरांना शस्त्रक्रिया करता येते. कॅन्सर व विनाकॅन्सरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणद्वारे मेडिकलमध्ये केल्या जात असल्याची माहिती डॉ. राज गजभिये यांनी दिली. डॉ. दवे म्हणाले, दुर्बिणद्वारे करण्यात येणारी शस्त्रक्रिया खूप काळजीपूर्वक आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने करावी लागते. कॅन्सरच्या शस्त्रक्रियेमध्ये केवळ कॅन्सर काढण्याचे काम नसते तर कॅन्सर पसरविणाऱ्या सर्व गाठी म्हणजे (लिंफ नोड) काढणे खूप आवश्यक असते. परिषदेत जठराचा कॅन्सर, लहान व मोठ्या आतडीचा कॅन्सर, गर्भपिशवीचा कॅन्सर, पित्ताशयाचा कॅन्सर, स्वादुपिंडचा कॅन्सर, किडनीचा कॅन्सर, लिव्हरचा कॅन्सर, मूत्राशयाचा कॅन्सर व इतर अवयवांवर दुर्बिणद्वारे शस्त्रक्रियाची माहिती या परिषदेत तज्ज्ञाकडून दिली जाणार आहे.