शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

ेसारांश

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

सुरक्षा जवानांना राखी भेट

सुरक्षा जवानांना राखी भेट
नागपूर : २० महाराष्ट्र बटालियन एनसीसी युनिट, धनवटे नॅशनल कॉलेजतर्फे देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर असणाऱ्या सुरक्षा जवानांसाठी रक्षाबंधनानिमित्त महाविद्यालयातील एनसीसी कॅडेटस्नी लेफ्ट. सुभाष दाढे यांच्या मार्गदर्शनात राख्या जमा केल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य तायवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन भेलकर यांनी केले. याप्रसंगी डॉ. चंगोले, संगीता जीवनकर, गहरवार, सुबोध तायवाडे, विशाल तालेवार, नीलेश ताकतोडे, पवन उईके, नीलेश साखरकर, रोहन बोरकुटे, नितीन मिसाळ उपस्थित होते.
-------
जीवन शिक्षण विद्यालयाचे सुयश
नागपूर : स्पोर्टस् कुने दो कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन मंदसौर, मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आले. या स्पर्धेत जीवन शिक्षण विद्यालयाच्या आकाश कुंभरे, कोमल कठाणे यांनी सुवर्णपदक, दिव्या माटे ब्रान्झ, अपूर्वा माकोडे यांनी चांदीच्या पदकांची कमाई केली. आकाश कुंभरे या कराटेपटूला ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. सर्व विजयी खेळाडूंचे शाळेच्या संचालक मंडळाने, मुख्याध्यापिका काळबेंडे, शारीरिक शिक्षक पी.डी. चावके, मोतीकर, श्याम भोवते यांनी अभिनंदन केले आहे.
-----------
क्षयरोगाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा
नागपूर : मोटघरे हनुमान मंदिरात स्वातंत्र्यदिन पंधरवड्यानिमित्त क्षयरोग जनजागृती अभियानांतर्गत क्षयरोग रॅलीचे आयोजन करण्यात आले. अक्षय प्रकल्पच्यावतीने युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी, ममता हेल्थ इन्स्टट्यिूट फॉर मदर ॲण्ड चाईल्डच्या सहयोगाने स्थानिक माजी नगरसेवक जुल्फेकार अली भुट्टो यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी भुट्टो यांनी क्षयरोगाची माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
-----
महागाईच्या विरोधात माकपची निदर्शने
नागपूर : कांद्याचे भाव ७० रुपये किलोच्या घरात गेले असून इतर पदार्थांचे, डाळीचे भावही गगनाला भिडले आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्हेरायटी चौकात निदर्शने केली. पक्षाचे जिल्हा सचिव अमृत कोल्हे म्हणाले, मागील काही वर्षांपासून अचानक जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढत आहेत. यासंदर्भात जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर शासनाचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. यानंतर पक्षाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.