शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘साखरेचे खाणार, त्याला देव लवकर नेणार’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 18:55 IST

साखरेच्या घातक व्यसनापासून स्वत:ला कसं करणार मुक्त?

ठळक मुद्देप्रोसेस्ड फूडची सवय मोडायला हवी. ही सवय जर मोडली तरी बºयाच प्रमाणात साखरेचं व्यसन आटोक्यात येऊ शकतं.आपल्या शरीरातील ‘हॅपिनेस हार्मोन्स’चं प्रमाण जाणीवपूर्वक वाढवायला हवं.अति गोड खाण्याची इच्छा नैसर्गिकरित्या भागवली गेली तर साखर किंवा साखरेचे पदार्थ खाण्याची गरज पडत नाही.

- मयूर पठाडे‘साखरेचे खाणार, त्याला देव देणार’ अशी एक म्हण आपल्याकडे आहे. खरं तर या म्हणीचा अर्थ आहे, जो चांगली इच्छा करतो, त्याला फळही तसं चांगलंच मिळतं.. जशी इच्छा तसे फळ.. पण या म्हणीचा जर शब्दश: अर्थ घेऊन साखर जास्त खायला लागलात, तर मात्र अगदीच विपरित परिणाम होईल. शास्त्रज्ञांचं तर सरळच म्हणणं आहे, ‘साखरेचे खाणार, त्याला देव लवकर नेणार’ ! अर्थातच जास्त गोडखाऊंचं आयुष्य कमी असतं हे शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रयोगांनी सिद्धही केलं आहे.साखरेचं व्यसन सर्वात घातक. कारण हे व्यसन सुटता सुटत नाही. कारण आपल्याला हे व्यसन आहे, हेच अनेकांना कळत नाही, पण त्यासाठी वेळीच आणि जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर साखरेचं व्यसन नक्कीच आटोक्यात येऊ शकतं आणि त्यापासून आपल्या शरीरावर होणारे गंभीर दुष्परिणामही आपण टाळू शकतो.त्यासाठी मनापासून आणि चिकाटीनं प्रत्यन मात्र करावे लागतील.साखरेचं व्यसन सोडण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. त्याचं पालन केलं तरी साखरेच्या या ‘गोड’ आजारापासून आपण दूर राहू शकतो.साखरेचं व्यसन कसं सोडाल?१- प्रोसेस्ड फूड खाण्याची आपल्याला आता इतकी सवय आहे की त्याशिवाय खरोखरच आपलं पान हलत नाही. दुकानातही तयार मिळणाºया या पदार्थांपासून शरीराची खूप मोठी हानी होते. मुख्य म्हणजे साखरेसारखीच या गोष्टींची चटक लागते. ती आपल्याला सोडवत नाही. त्यामुळे प्रोसेस्ड फूडची सवय आपल्याला अगोदर मोडायला हवी. ही सवय जर मोडली तरी बºयाच प्रमाणात साखरेचं व्यसन आटोक्यात येऊ शकतं.२- आपल्या शरीरात सेरोटेनिन नावाचं हार्मोन असतं. या हार्मोनला ‘हॅपिनेस हार्मोन’ असं म्हटलं जातं. हे हार्मोन आपल्या शरीरात वाढावं यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अर्थात ते नैसर्गिकरित्या वाढायला हवं. नियमित व्यायाम, योग्य आणि पुरेशी झोप, हेल्दी डाएट.. इत्यादि गोष्टींमुळे आपल्या शरीरातील सेरोटेनिन हार्मोन्सची मात्रा वाढू शकते. त्यामुळे अर्थातच गोड खाण्याची तुमची इच्छाही कमी होते.३- अति गोड खाण्याची जी अांपली इच्छा आहे, ती नैसर्गिकरित्या भागवली गेली तर साखर किंवा साखरेचे पदार्थ खाण्याची मग गरज पडणार नाही. नॅचरल स्विटनर्समध्ये शून्य कॅलरीज असतात, शिवाय आपल्या रक्तातील साखरेचं प्रमाण त्यामुळे वाढत नाही. शिवाय साखरेपेक्षा ते गोड असतात. त्यामुळे हे नॅचरल स्विटनर्स जर आपण खाल्ले तर साखरेची आपली तीव्र आकांक्षा कमी होऊ शकते.४- आहारातील, आपल्या ताटातील हिरवा रंग वाढवायला हवा. ग्रिन ड्रिंक्समुळेही आपल्या शरीराला अत्यावश्यक घटक मिळतात आणि साखरेची चटकही कमी होते.साखरेची चटक सोडण्यासाठी आणखीही काही उपाय आहेत. ते पाहूया पुढच्या भागात..