शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘रोटाव्हायरस’ लसीकरण मोहिम यशस्वी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 11:32 IST

महापालिका : डॉ.प्रकाश नांदापूरकर यांची कार्यशाळेत माहिती

ठळक मुद्देdhule

धुळे : देशात दरवर्षी अतिसारमुळे ७८०० बाजकांचा मृत्यु सामोरे जावे लागते़ मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी ६ महिने ते २ वर्षे वयाच्या बाळांमध्ये रोटाव्हायर लस दिल्यास आजारपणावर मात करता येवू शकते अशी माहिती नाशिक येथील सर्व्हेलन्स मेडिकल आॅफिसर डॉ़ प्रकाश नांदापुरकर यांनी दिली़शहरातील जुन्या महापालिकेच्या सभागृहात  सोमवारी दुपारी रोटाव्हायर लसीकरणाबाबत आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाºयांची कार्र्यशाळा घेण्यात आली़ यावेळी मनपा आरोग्य अधिकारी डॉ़ मधुकर पवार, आर सी एच अधिकारी डॉ़ जे़ सी़पाटील यांनी मार्गदर्शन केले़पुढे बोलतांना नांदापुर म्हणाले की,  ६ महिने ते २ वर्ष वयाच्या लहान मुलांना रोटाव्हायरसमुळे होणारे जुलाब सर्वसाधारणपणे दिसतात. यातही एक वर्षाच्या आतल्या बाळांमध्ये प्रादुर्भाव अधिक आढळतो. विशेष म्हणजे हा विषाणू स्वच्छता पाळल्यानंतरदेखील पसरू शकतो. रोटाव्हायरस लशीचा पहिला डोस वयाच्या ६ आठवडयानंतर देतात. काही कारणाने डोस न घेतल्यास पहिला डोस १६ आठवडयापर्यंत व शेवटचा डोस ३२ आठवडयापर्यंत   देता येवू शकते़ चार वर्षांपूर्वी देशात झालेल्या अभ्यासानुसार जुलाब-उलट्यांमुळे रुग्णालयात भरती करावे लागणाºया ४० टक्के लहान मुलांच्या आजाराचे कारण रोटाव्हायरस असल्याचे समोर आले आहे़  बालकांचा मृत्युचा दर कमी करण्यासाठी रोटाव्हायरस या लसीचा समावेश करण्यात आला आहे़  शासनातर्फे आता नियमित लसीकरण कार्यक्रमात आता रोटाव्हायरस या लसचा समावेश करण्यात आला आहे़ ही लस खासगी रूग्णालयात ८०० ते १५०० रुपयापर्यंत  मिळते़ मात्र शासनाकडून पुढील आठवड्यापासुन महापालिकेच्या आरोग्य केंद्रातुन मोफत दिली जाणार असल्याची माहिती कार्यशाळेत डॉ़  नांदापुरकर यांनी दिली़सहज लस देता येवू शकते- डॉ़मधुकर पवाररोटाव्हायरस लस घेतल्यानंतरही मुलांना या विषाणूमुळे होणारे जुलाब होतात, परंतु त्यांची तीव्रता खूप कमी असते, त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज भासत नाही. देशातील तीन कंपन्या या लशीच्या उत्पादनात असून ही लस तोंडावाटे देण्याची असल्यामुळे ती आरोग्य कर्मचाºयांना सहन देता येवू शकते असे मनपा आरोग्य अधिकारी डॉ़मधुकर पवार यांनी सांगितले़ 

मोफत लसीकरण..अतिसारमुळे होणाºया मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दिड महिना ते एक वर्ष वयोगटातील बालकांना ३ वेळा ही लस देण्यात मोफत देण्यात येणार आहे़

टॅग्स :Dhuleधुळे