शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

अभ्यास सांगतोय रोज 10 मीनिटं ध्यानधारणा करा आणि 5 त्रासापासून मुक्त राहा!

By admin | Updated: May 6, 2017 16:44 IST

तुम्ही व्यायामासाठी भलेही तासभर नाही काढू शकलात तर किमान दहा मीनिटं काढाच. आणि या दहा मीनिटात एका जागी शांत बसून ध्यानधारणा करा. कारण दहा मीनिटाच्या ध्यानधारणेने 5 महत्त्वाचे त्रास कमी होतात

रोज अमूक ढमूक मीनिटं व्यायाम करा, तमूक किलोमीटर चाला. तुमच्या इतक्या कॅलरीज बर्न झाल्या पाहिजे वगैरे वगैरे.. पण या गोष्टी स्वत:ला जोडायला गेलो तर प्रत्येकाच्याच तोंडी एकच वाक्य, ‘अहो रोजच्या रामरगाड्यात आहे कोणाला इतका वेळ?’ ‘स्वत:साठी 24 तासातले 5 मीनिटं काढणं अवघड तिथे तासाभराचा व्यायाम झेपेल कोणाला?’व्यायाम टाळण्याच्या सबब सांगितल्या की व्यायाम न करणारे मोकळे होतात. पण आता देशा परदेशातला आरोग्यविषयक अभ्यास सांगतोय की तुम्ही व्यायामासाठी भलेही तासभर नाही काढू शकलात तर किमान दहा मीनिटं काढाच. आणि या दहा मीनिटात एका जागी शांत बसून ध्यानधारणा करा. कारण दहा मीनिटाच्या ध्यानधारणेने 5 महत्त्वाचे त्रास जे कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच छळतात त्या त्रासापासून आपण कायमचं मुक्त होवू शकतो. 10 मीनिटाची ध्यानधारणा केवळ 5 त्रासांवरचा इलाज नसून आनंदी आणि निरोगी आरोग्याची गुरूकिल्ली आहे. याविषयावर अभ्यास आणि संशोधन करणारे अभ्यासक आणि संशोधक रेटून सांगता आहेत की, आता वाट पाहू नका स्वत:साठी रोज फक्त दहा मीनिटं काढा आणि ध्यानधारणा करा!

 

ध्यानधारणेने होते या पाच त्रासातून सुटका1 ताण

ताण हा जागेपणीच काय तर झोपेत सुध्दा जाणवतो. या ताणावरचा रामबाण उपाय म्ह्णजे ध्यानधारणा. ध्यानधारणेमुळे फक्त शरीरालाच आराम मिळतो असं नाही तर मानसिक पातळीवरही खूप आराम मिळतो. ध्यानधारणेचा थेट परिणाम मज्जासंस्थेवर होतो. ध्यानधारणेमुळे मज्जासंस्थेतून स्त्रवणारं ‘कॉर्टिसॉल’नावाचं रसायन जे ताण वाढवतं त्यावर नियंत्रण येतं. ध्यानधारणेमुळे शरीरातील आॅक्सिजनच्या अतिवापरावर नियंत्रण येतं. हदयाचे वेगाने पडणारे ठोके, जोरात लागणारा श्वास, वाढणारा रक्तदाब या सर्वांवर ध्यानधारणेमुळे नियंत्रण येतं. ध्यानधारणेमुळे या वाईट गोष्टी जशा कमी होतात आणि तशा चांगल्या गोष्टीही वाढतात. ध्यानधारणेमुळे मेंदूतल्या अल्फा, थेटा आणि डेल्टा यासारख्या प्रवाहांना चालना मिळते. आणि त्याचा परिणाम म्हणून दिवसभर छान हलकं फुलकं वाटतं. कसलाही ताण येत नाही. 2 दुखणं आणि वेदना

शरीराच्या कितीतरी वेदना आणि सततचं जुनाट बारीक सारीक दुखणं खुपणं ध्यानधारणेमुळे कुठल्या कुठे पळून जावू शकतं. ‘जर्नल आॅफ बिहॅवेरिअल मेडिसिन’यावरचा एक अभ्यास प्रसिध्द झाला होता त्यात ध्यानधारणेचा वेदनेवर एका जादू सारखा परिणाम होतो हे सांगितलं गेलं आहे. नियमित दहा मीनिटांच्या ध्यानधारणेमुळे पाठदुखी, जुनाट अर्धशिशीचा त्रास, ताणामुळे होणारी डोकेदुखी थांबते.

 

3 भीती

जर्नल आॅफ क्लिनिकल सायकॉलॉजीचा एक अभ्यास सांगतो की मनातल्या भीतीवर विजय मिळवण्याचं कोणतंच औषध नाही. त्यावर एक साधा सोपा उपाय म्हणजे रोज फक्त दहा मीनिटं ध्यानधारणा. ती केली की मनातली भीती जाते. डिप्रेशन सारख्या मानसिक व्याधींनी ग्रस्त असलेल्यांनी रोज दहा मीनिटं याप्रमाणे सात आठवडे ध्यानधारणा केली तर त्यांच्यातलं नैराश्य कमी होतं असं अभ्यासानं सिध्द झालं आहे.

4 हदयाशीसंबधित आजार‘अर्काइव्हज आॅफ इन्टर्नल मेडिसन’मधल्या अभ्यास अहवालांचे नियमित वाचन करणाऱ्या एका हदयरोग्यानं अभ्यासात नमूद केल्यानुसार नियमितपणे 16 आठवडे रोज दहा मीनिटं ध्यानधारणा केली ज्यामुळे त्या रूग्णाचा आटोक्यात न येणारा रक्तदाब आटोक्यात आला. या विषयीचा अभ्यास हेच सांगतो की सहा ते नऊ महिने नियमित दहा मीनिटं ध्यानधारणा केली तर हदयविकाराच्या झटक्याची, ब्रेन स्ट्रोकची शकयता कमी होते.

5 निद्रानाश

मिनेसोटा विद्यापीठाच्या अभ्यासानं हे सिध्द केलं आहे की जर निद्रानाश असलेल्या रूग्णांनी सलग तीन महिने रोज न चुकता दहा मीनिटं ध्यानधारणा केली तर त्यांच्यातला निद्रानाश जातो. असे रूग्ण ध्यानधारणेच्या प्रयोगानं शांत झोपतात आणि ध्यानधारणेमुळे त्यांची झोप पूर्णही होते.