आजपासून सोनोग्राफी चालकांचा बेमुदत बंद
By admin | Updated: June 20, 2016 00:23 IST
जळगाव : सोनोग्राफी तज्ज्ञांना विविध कारणांनी व कायद्याचा धाक दाखवून विनाकारण त्रास वाढत असल्याने त्यांच्या निषेधार्थ राज्यभरातील सोनोग्राफी तज्ज्ञांनी २० जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जळगावच्या डॉक्टरांचाही समावेश असून त्यास इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पाठिंबा दर्शविला आहे.
आजपासून सोनोग्राफी चालकांचा बेमुदत बंद
जळगाव : सोनोग्राफी तज्ज्ञांना विविध कारणांनी व कायद्याचा धाक दाखवून विनाकारण त्रास वाढत असल्याने त्यांच्या निषेधार्थ राज्यभरातील सोनोग्राफी तज्ज्ञांनी २० जूनपासून बेमुदत बंद पुकारला आहे. यामध्ये जळगावच्या डॉक्टरांचाही समावेश असून त्यास इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) पाठिंबा दर्शविला आहे. राज्यभरात सोनोग्राफी केंद्र चालकांना त्यांच्या परवान्याचे नुतणीकरण, केंद्राची परवानगी, नवीन मशिनची परवानगी व केंद्राची तपासणी करताना तपासणी करणारे अधिकारी त्रास देतात. या सोबतच कायद्याचा धाक दाखवून त्यांना वेठीस धरण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असल्याच्या कारणामुळे सोनोग्राफी केंद्र चालक त्रस्त झाले आहेत. या संदर्भात वारंवार तक्रारी करुनही उपयोग होत नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. हा प्रकार पुणे येथे सर्वात जास्त वाढल्याने तेथे गेल्या आठवडभरापासून सोनोग्राफी केंद्र चालकांनी बंद पुकारला आहे. त्यास गेल्या सोमवारी एक दिवस जळगावातही बंद पाळून पाठिंबा देण्यात आला होता. मात्र आठ दिवसांपासून काहीही उपयोग होत नसल्याने पुण्यासह आता राज्यभरात सोमवार, २० जून पासून बेमुदत बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमध्ये स्त्री रोग तज्ज्ञांचा समावेश नाही. असे असले तरी या बंदमुळे विविध विकारांच्या रुग्णांवर मोठा परिणाम होणार असल्याची चिन्हे आहेत. आयएमएचा पाठिंबा....या बेमुदत बंदला इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) पाठिंबा देत असल्याचे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले. हा अन्याय थांबला पाहिजे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे.