शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्टफोन मिनिटा मिनिटाला करतो तुमचं आयुष्य कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 17:00 IST

मेंदूच्या कॅन्सरचा धाका वाढतो तब्बल ४०० टक्क्यांनी!

ठळक मुद्देमोबाईलच्या रेडिएशनचा थेट मेंदूवरही प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावरही या रेडिएशनचा अत्यंत प्रतिकुल परिणाम होतो. आपल्या डीएनएवर हे रेडिएशन परिणाम करतात आणि त्यामुळे होणारे नुकसान कधीच भरून न येणारे असते.

- मयूर पठाडेखरंच सांगा, स्मार्ट फोनशिवाय तुमचं पान हलतं? फोन नुसता दोन मिनिट जरी नजरेआड गेला तरी साºया विश्वापासून आपण तुटल्याचा भास आपल्याला होतो. नुसता भास नाही, अनेकांच्या दृष्टीनं ते वास्तवच असतं आणि आहे. अनेक कारणं आहेत, पण आजकाल अगदी कुमारवयीन आणि लहान मुलांच्याही हातात स्मार्ट फोन दिसतो.. अर्थातच या फोनचे अनेक उपयोग आहेत. शैक्षणिक उपयुक्ततेपासून तर जगाशी कनेक्ट राहण्यापर्यंत आणि तुमची, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यापर्यंत अनेक गोष्टी या स्मार्टफोननं सुलभ, अगदी सोप्या करून टाकल्य आहेत.पण कोणतीही गोष्ट एका मर्यादेत असली तरच त्याचा फायदा होतो. स्मार्टफोनच्या बाबतीतही ते खरं आहे. स्मार्टफोनचे जसे फायदे आहेत, तसे महाभयंकर तोटेही आहेत. हा फोन जसा तुम्हाला जगाशी जोडतो तसाच तो तुम्हाला जगातून उठवूही शकतो.आयआयटी मुंबईचे प्रोफेसर गिरीश कुमार यांनी स्मार्टफोनच्या वापराचे, विशेषत: कुमार आणि तरुणांवर काय दुष्परिणाम होतात याचा चिकित्सक अभ्यास करून तो अहवाल केंद्र सरकारकडे पाठवला आहे.गिरीश कुमार यांच्या अभ्यासानुसार स्मार्टफोन कितीही उपयुक्त असला तरीही दिवसभरात अर्ध्या तासापेक्षा त्याचा जास्त वापर करणं म्हणजे तुमच्या जिवाशीच खेळ होऊ शकतो.स्मार्ट फोनमुळे उद्ध्वस्त होऊ शकतं तुमचं आयुष्य..स्मार्ट फोनच्या वापरामुळे टिनेज मुलांमध्ये मेंदूच्या कॅन्सरचं प्रमाण तब्बल ४०० टक्क्यांनी वाढू शकतं.कोवळ्या वयात मुलांची कवटीही तुलनेनं विकसित झालेली नसते. मोबाईलच्या रेडिएशनचा थेट त्यांच्या मेंदूवरही प्रतिकुल परिणाम होऊ शकतो.प्राणी आणि वनस्पतींच्या आरोग्यावरही या रेडिएशनचा अत्यंत प्रतिकुल परिणाम होतो.आपल्या डीएनएवरही हे रेडिएशन परिणाम करतात आणि त्यामुळे होणारे नुकसान कधीच भरून न येणारे असते.आपल्या झोपेचं सारं शेड्यूल बिघडतं आणि त्यासंबंधीचे विकार जडतात.अल्झायमर, पर्किन्सन्स आणि मेंदूचे विकार वाढीला लागतात.