शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

नवशिक्यांसाठी घरातही करता येईल असा सोप्पा, पण फायदेशीर व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 18:00 IST

संपूर्ण शरीरालाच येईल त्यामुळे टोन.

ठळक मुद्देघरातल्या घरात आधी थोडा वॉर्म अप करा. त्यानंतर आपल्याला जेवढे झेपेल तेवढे पुशअप्स काढा.पुशअप्स झाल्यानंतर थोडा अ‍ॅबडॉमिनल म्हणजे पोटाचा एक्सरसाइज करावा.आपल्या शरीराच्या खालच्या भागाकडे, पायांकडेही तितकंच लक्ष द्यायला हवं.

- मयूर पठाडेकारण काहीही असो, पण अनेकांना जिममध्ये किंवा ग्राऊंडवर जाऊन व्यायामला वेळ होत नाही, हे वास्तव आहे. ज्यावेळी आपल्याला वेळ आहे, नेमक्या त्यावेळी जिम बंद असतात, ग्राऊंडवर कोणीच नसतं किंवा आपल्याला सोयीची जी वेळ असते, त्यावेळी बाहेर कुठे जाऊन व्यायाम करायचं म्हटलं तर आपल्यालाच फार आॅकवर्ड वाटतं.मग त्यासाठी घरच्या घरी काही उत्तम उपाय आहे का?गेल्या भागात आपण त्यासाठीचे काही व्यायामप्रकार पाहिले. या भागात आता आणखी काही माहिती..घरातल्या घरात आधी थोडा वॉर्म अप करा. हातपाय हलवण्यापासून, तर जागेवरच उड्या मारण्यापर्यंत काहीही करता येईल. त्यानंतर आपल्याला जेवढे झेपेल तेवढे पुशअप्स काढा.महिला आणि पुरुष दोघांनाही याचा चांगला फायदा होईल.पुशअप्समुले आपल्या हाताचे ट्रायसेप्स, बायसेप्स आणि त्याचबरोबर चेस्ट मसल्सचा टोनही सुधारेल. अनेकांना, विशेषत: महिलांना आपल्या पोटाची खूपच काळजी असते. त्यामुळे पुशअप्स झाल्यानंतर थोडा अ‍ॅबडॉमिनल म्हणजे पोटाचा एक्सरसाइज करावा. चेस्ट मसल्स टार्गेट करण्यासाठी आपल्याला जमतील तेवढे डिप्स मारावेत. अर्थातच सुरुवातीला कोणताही आततायीपणा नको. नाहीतर अंग दुखायला लागतं आणि त्यामुळेच मग बरेच जण आपल्या व्यायामाचा श्रीगणेशा अकालीच संपवतात.आपल्या शरीराच्या खालच्या भागाकडे, पायांकडेही तितकंच लक्ष द्यायला हवं. मांड्यांसाठी लंजेस आणि पोटºयांसाठी, भिंतीचा वगैरे आधार घेऊन पायाच्या बोटांवर उभं राहून पोटºयांना ताण द्यावा.अप्पर बॉडी, लोअर बॉडी आणि अ‍ॅबडॉमिनल एक्सरसाइजेसामुळे तुमच्या शरीराचा संपूर्ण व्यायाम होईल. तुमच्यात जर अजून एनर्जी शिल्लक असेलच, तर हेच रिपिटेशन पुन्हाही करता येईल. पण अर्थातच हा व्यायाम नवशिके आणि व्यायामाला नुकतीच सुरुवात केलेल्यांसाठी आहे.