SEX KNOWLEDGE : लैंगिक शिक्षण आहे महत्त्वाचे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2017 14:58 IST
लैंगिक जीवनात स्त्रीला फक्त भोगवस्तू समजले जाते. त्यामुळे संसारात वाद निर्माण होऊन आपले जीवन दु:खमय होते. बऱ्याचदा भावनेच्या भरात जर स्त्रीने आपली इच्छा व्यक्त केली तर तिला आपण वाईट चालीची, कामिनी असे समजले जाते.
SEX KNOWLEDGE : लैंगिक शिक्षण आहे महत्त्वाचे !
-Ravindra Moreआपले वैवाहिक जीवन आनंदी व समृद्ध होण्यासाठी समाधानी लैगिंक जीवन खूप आवश्यक असते, असे बऱ्याच संशोधनात आढळून आले आहे. मात्र बऱ्याचदा लैंगिक जीवनात स्त्रीला फक्त भोगवस्तू समजले जाते. त्यामुळे संसारात वाद निर्माण होऊन आपले जीवन दु:खमय होते. बऱ्याचदा भावनेच्या भरात जर स्त्रीने आपली इच्छा व्यक्त केली तर तिला आपण वाईट चालीची, कामिनी असे समजले जाते. याउलट तिने जर नापंसती दाखविली तर ती धर्मपत्नी आहे म्हणून तिच्या मनाविरुद्ध समागम करायचा, हा कुठला न्याय? मात्र आता बदलत असलेल्या मानसिकतेने थोड्याफार प्रमाणात स्त्रीयांना लैंगिक जीवनाचा मोकळेपणानं आनंद घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण गर्भारपण-बाळंतपण ह्या सातत्याने येत राहणाऱ्या दिव्यातून ती आत्ता कुठं मोकळी होऊ पाहाते आहे. कारण तिला तिच्या निरनिराळ्या वयातील भूमिकेनुरूप लैंगिक ज्ञान मिळत आहे. याखेरीज मुलगी, तरुणी, नववधू, पत्नी आणि माता या सर्व अवस्थेत तिला योग्य मार्गदर्शन मिळालं तर लैंगिक शिक्षण हा सुखाचा मूलमंत्र ठरेल.आपल्याकडे तसे लैंगिक शिक्षण नवीन नाही. याबाबत शास्त्रीय अभ्यास करु न ऋषिमुनींनी त्यावर ग्रंथरचानाही केली होती. त्यांनी त्याला असं अवास्तव महत्त्व दिलं नव्हतं. तसा तो विषय त्याज्यही मानला नव्हता. मात्र पुढे त्याला अनिष्ट वळण लागलं आणि त्याचा बाऊ करून तो विषय त्याज्य मानला गेला. औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे समाजजीवन झपाट्याने बदलत गेलं व स्त्री-पुरुष संमिश्र समाजपद्धती वाढत गेली. प्रौढ विवाहकडे तरुण वर्ग झुकू लागला. लैंगिक भावनेला खतपाणी घालून चेतविणारं बहुप्रकारचे वाड्:मय, व्यावसायिक भडक जाहीरातबाजी व करमणूकीची साधने ह्यामुळे भोगवादी स्वैराचाराला उधाण आलं. त्यामुळं अवांच्छीत गर्भधारणा, गर्भपात, गुप्तरोग ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं. ह्या सर्व परिस्थिमुळे समाजशास्त्रज्ञांना, वैद्यकवर्गाला व शिक्षणतज्ज्ञांना निकोप व जबाबदार लैंगिक शिक्षण देण्याची गरज भासू लागली.