शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बघा, तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते की नाही ते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 14:36 IST

प्रत्येक क्षण जगण्याचे दोन पर्याय आपल्याकडे असतात. तुम्ही कोणता निवडणार?

ठळक मुद्देआपला रोजचा दिवस शांततेनं कसा सुरू होईल याचा शक्यतो प्रयत्न करा.स्वत:ला रिलॅक्स ठेवा.स्वत:च्या शरीराला, मनाला तणावरहित ठेवलं तर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट नक्कीच मिळेल..

- मयूर पठाडेप्रत्येक क्षण कसा जगणार, कसा जगायचा याचे दोन पर्याय आपल्याकडे असतात. नेहेमीच. त्यातला कोणता पर्याय निवडायचा हे आपण ठरवायचं असतं.प्रत्येक क्षण आपण एकतर शांततेनं जगू शकतो किंवा संघर्षपूर्ण.. प्रत्येक क्षण तुम्ही शांततेनं, कोणतीही झटापट न करता जगालात तर तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि जेव्हा जेव्हा तुम्ही त्या क्षणाशी, प्रसंगाशी झटापट करता, संघर्ष करता, त्यावेळी आपल्या शरीरात निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते. या दोन्ही एनर्जीचे फायदे अर्थातच आपल्याला माहीत आहेत.त्यामुळे खात्रीने आपला पहिला पर्याय असेल तो शांततेनं जगण्याचा. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात निर्माण करण्याचा... पण कशी निर्माण करायची ही पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यात?..त्यासाठीच या काही टिप्स..आपला रोजचा दिवस शांततेनं कसा सुरू होईल याचा शक्यतो प्रयत्न करा. त्यासाठी ध्यानधारणेचाही उपयोग करता येईल. त्यासाठी प्रत्येक वेळी अगदीच तासन्तास ध्यान आणि योगा करण्याची आवश्यकता नाही, पण मन शांत ठेवण्याची कला, एकाग्र करण्याची कला आपल्याला साधता यायलाच हवी.स्वत:ला रिलॅक्स ठेवा. तुम्ही म्हणाल, कसं ठेवायचं स्वत:ला रिलॅक्स? बोलणं सोपं आहे, पण करणं कठीण. ते कदाचित कठीण असेल, पण जमणारच नाही, इतकं अशक्य नक्कीच नाही. एकदा सुरुवात केली म्हणजे त्यातला सोपेपणाही आपलाच आपल्याला कळायला लागतो. त्यामुळे आधी सुरुवात तर करा. करा स्वत:च्या शरीराला, मनाला रिलॅक्स.. त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट नक्कीच मिळेल..स्वत:ला रिलॅक्स करण्याचा सर्वाेत्तम आणि सर्वात सोपा उपाय म्हणजे संगीत. आपल्याला आवडतं ते संगीत रोज किमान काही वेळ तरी ऐका. विशेषत: तुमचा दिवस सुरू होण्याच्या काळात. हे संगीत तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी तर निर्माण करीलच, पण अनेक ताणतणावांपासून तुम्हाला दूर ठेवताना त्याच्याशी सहजपणे दोन हात करण्याची ऊर्जाही तुम्हाला देईल.