शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पोटाचा घेर वाढणार नाही तर काय?..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 15:30 IST

‘बसल्या जागी’ सारं काही हवं असेल, तर दुसरं काय मिळणार?

ठळक मुद्देभले तुम्ही काम करीत असाल, पण ते बैठं असेल, तर पोटावरच्या सुरकुत्या निश्चितपणे वाढत जाणार.आपल्या घरात आणि बाहेर, आॅफिसात वेफर्सची पाकिटं, शितपेयं, सोड्याच्या बाटल्या किती वेळा आपल्या हातात? आपल्याला फुगवण्यात त्यांचा खूप मोठा हातभार आहे.किती गोष्टी तुम्हाला ‘बसल्या जागी’ मिळतात? त्यासाठी किमान चालायचे तरी कष्ट आपण घेतोय का?

- मयूर पठाडेकशी काय तुमची तब्येत?.. कसंही असलं तरी दोन गोष्टी आपल्याकडे सर्रास दिसतात. काहींना वाटत असतं, आपण फारच लठ्ठ आहोत, आपल्याला बारीक व्हायची गरज आहे, तर काहींना वाटत असतं, आपल्याला काहीही झालेलं नाही. आपली तब्येत विशेषत: पोट अगदी व्यवस्थित आहे..आपण लठ्ठ होत आहोत, याकडे अनेकांचं लक्षच नसतं किंवा त्यांनी सोयीस्करपणे स्वत:चा तसा समज करून घेतलेला असतो. कारण हा लठ्ठपणा एका दिवसात कधीच वाढत नसतो आणि कालच्यापेक्षा आज मी अमूक इतका जाड झालो, असं लगेच दाखवताही येत नाही. कारण ही प्रक्रिया हळूहळू पण निश्चितपणे होत असते.. ती प्रक्रिया समजून घेतली तर अनेकांची लठ्ठपणाची समस्या दूर होऊ शकेल..

कसा वाढत जातो आपला घेर?..१- आॅफिस असो कि घर.. आपण किती वेळ ‘बसून’ असतो, याचा विचार प्रत्येकानं करायला हवा. भले तुम्ही काम करीत असाल, पण ते बैठं असेल, तर पोटावरच्या सुरकुत्या निश्चितपणे वाढत जाणार.२- आपल्या घरात आणि फावल्या वेळी, बाहेर, आॅफिसात वेफर्सची पाकिटं, शितपेयं, सोड्याच्या बाटल्या किती वेळा आपल्या हातात? त्यांचा आकार तुमच्या लक्षात येतोय? नीट पाहिलं तर ही पाकिटं दिवसेंदिवस फुगत जातानाच तुम्हाला दिसतील. ही पाकिटं त्यांच्याबरोबर आपल्यालाही फुगवतात.३- आज करू, उद्या करू, म्हणून व्यायामाला किती वेळा तुम्ही पुढे ढकलंलय? किती वेळा, किती दिवस सलगपणे व्यायाम केलाय? करताय? अगदी व्यायाम जरी केला नाही, तरी किती गोष्टी तुम्हाला ‘बसल्या जागी’ मिळताहेत? त्यासाठी किमान चालायचे तरी कष्ट आपण घेतोय का?४- तुमचा बीएमआय कधी मोजलाय? म्हणजे तुमचा बॉडी मास इंडेक्स? आपलं वजन, वय आणि उंची यानुसार आपला बीएमआय ठरतो. तो जर २५ ते ३०च्या दरम्यान असेल, तर तुम्ही लठ्ठ आहात आणि ३०च्या पुढे गेला असेल तर अतिलठ्ठ! त्यावर तरी विश्वास ठेवाल की नाही?५- कोणतीही गोष्ट एकदम होत नाही. तुम्ही जसं हळूहळू लठ्ठ झालात, तसंच हळूहळूच बारीक होऊ शकाल. पोटाचा घेर कमी करू शकाल. त्यासाठी आहे तुमची तयारी?.. हळूहळूच, पण सुरुवात तरी नक्की करावी लागेल.कराल आजपासून?.. कारण ‘उद्या’ कधीच येत नाही..