शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनाचा फायदा दुर्बल घटकांपर्यंत पोहचवा (भाग-१)

By admin | Updated: July 10, 2015 23:13 IST

-मुख्यमंत्री फडणवीस : कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञांच्या परिषदेचे उद्घाटन

-मुख्यमंत्री फडणवीस : कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञांच्या परिषदेचे उद्घाटन
(फोटो )
नागपूर : सुदृढ आरोग्य असणारा देश अधिक प्रगती करू शकतो. अशावेळी आरोग्य संबंधीच्या परिषदांमधून होणाऱ्या ज्ञानाची देवाण-घेवाण महत्त्वाची ठरते. यातून जगात होत असलेल्या विविध संशोधनाची माहिती मिळते. या संशोधनाचा फायदा दुर्बल घटकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी येथे केले.
विद्या शिक्षण प्रसारक मंडळातर्फे संचालित दंतरोग आणि संशोधन केंद्रातर्फे१७ व्या राष्ट्रीय पदव्युत्तर कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञांच्या परिषदेचे नागपूर येथील डिगडोह येथे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून क्रि ष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा, नवी दिल्ली येथील मौलाना आझाद दंतरोग संस्थेचे संचालक पद्मश्री डॉ. महेश वर्मा, भारतीय कृत्रिम दंत शास्त्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सी.एल. सतीश बाबू, डॉ.व्ही रंगराजन, विद्या शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी मंत्री रणजित देशमुख, आमदार आशिष देशमुख, डॉ. शाम गुंडावार, डॉ. के. महेंद्रनाथ रेड्डी, डॉ. हिंमाशु एरण, उपस्थित होते.
संमेलनाच्या संयोजक अध्यक्षा डॉ. उषा रडके उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिकीकरणामुळे ज्ञानाच्या कक्षा रु ंदावत चालल्या आहेत. परिणामी, आरोग्याच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध होऊ घातल्या आहेत. असे असतानाही बहुतांश भागात जन्माला येणारी बालके कुपोषित आहे. कर्करोगाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत: मध्य भारतात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. हे थांबविण्यासाठी वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञांनी प्रतिबंधात्मक उपाय सुचवावे, असेही ते म्हणाले.
डॉ. मिश्रा म्हणाले, जागतिक आव्हानला सामोरे जाण्यासाठी दर्जेदार आरोग्य शिक्षण देण्याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. आरोग्य धोरणाच्या संदर्भात निर्णय घेणाऱ्या शासनाने वैद्यकीय संस्थांमध्ये कालानुरु प बदल करण्याची जबाबदारी निश्चित करावी. यामुळे समाजाला आरोग्याच्या नवीन तंत्राचा तातडीने फायदा होऊ शकेल. त्यांनी पीजीच्या विद्यार्थ्यांना विशेषज्ञ होण्याचे, शिक्षक होण्याचे आणि नवनवीन संशोधन करण्याचे आवाहनही केले.