शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
2
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
3
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
4
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
5
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
7
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
8
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
9
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
10
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
11
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
12
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
13
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
14
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
15
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
16
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
17
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
18
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
19
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
20
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल

घोरणाऱ्या व्यक्तीचा आपण घोरतो यावर विश्वासच बसत नाही; तुम्ही झोपेत घोरत असाल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 05:56 IST

घोरण्याबद्दल आणि त्याच्यामुळे असलेल्या गाढ (?) झोपेबद्दल आपल्या समाजात अनेक समज/ गैरसमज आहेत

रामायणामधली कुंभकर्णाची गोष्ट सगळ्यांनाच चांगली माहिती आहे. सहा महिने जागणे आणि सहा महिने सतत झोपणे अशी त्याची ख्याती!

युद्ध सुरू होताच चिंतित रावणाने  कुंभकर्णाला उठवायचा निर्णय घेतला. वाल्मिकींनी कुंभकर्णाच्या घोरण्याचे मोठे रंगतदार वर्णन केले आहे. ते लिहितात, कुंभकर्णाच्या घोरण्याच्या आवाजाने अख्खी गुहा हादरत होती! त्याला उठवायला गेलेले राक्षस त्या आवाजामुळे बेशुद्ध झाले! कर्णे, भेदी, दुंदुभि इत्यादी वाजंत्र्यांचा आवाज त्या घोरण्यापुढे निष्प्रभ ठरत होता... आणि या सगळ्या गोंधळामध्ये कुंभकर्ण मात्र गाढ झोपला होता.

घोरण्याबद्दल आणि त्याच्यामुळे असलेल्या गाढ (?) झोपेबद्दल आपल्या समाजात अनेक समज/ गैरसमज आहेत. १९९६ साली भारत-भेटीसाठी आलेल्या माझ्या मामाने प्रश्न विचारला होता, “काय अभिजित, सध्या काय नवीन शिकतो आहेस?” मी म्हटले “स्लीप मेडिसिन!”  त्यावर मामा थंडपणे म्हणाला, “अरे, ही सगळी वेस्टन फॅडं आहेत. भारतीयांना याची गरज नाही; कारण इथले लोक कधीही / कुठेही झोपू शकतात! अगदी लोकलमध्येदेखील घोरायला लागतात!”

- घोरणे आणि अतिनिद्रा ही सौख्याची लक्षणे आहेत, असा अनेकांचा गोड गैरसमज असतो.एखाद्या व्यक्तीला तो किंवा ती घोरते हे पटवण्याचा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्या मोबाइलमध्ये त्याचा आवाज आणि शक्य झाल्यास व्हिडिओ टेप करून ठेवणे. कारण  अनेकदा घोरणाऱ्या व्यक्तीचा आपण घोरतो यावर विश्वासच बसत नाही. गाढ झोपेत झालेल्या अनेक गोष्टी आपल्या लक्षात राहत नाहीत. एखाद्या कारणामुळे आपण जागे झालो ही बाब दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मरणात राहण्यासाठी ती जाग कमीतकमी साठ सेकंदांची असावी लागते. तरच त्या बाबीची नोंद (रजिस्टर) होते. जर एखादा माणूस रात्रभरात शंभरवेळेला जरी उठला; पण ६० सेकंदांच्या आत झोपला तर सकाळी उठल्यावर त्याला फ्रेश, ताजेतवाने वाटणार नाही. पण, “रात्रभरात किती वेळेला उठलात?” याचे उत्तर तो “एकदाही नाही” असेच देईल. - तर घोरणे! त्याबद्दल अधिक पुढल्या शुक्रवारपासून, येथेच!

- डॉ. अभिजित देशपांडे, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्लीप सायन्सेस iissreports@gmail.com