पीसीपीएनडीटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक दोन जणांना नवीन सोनोग्राफी मशिन : काहींचे नूतनीकरण
By admin | Updated: December 19, 2015 00:19 IST
जळगाव : गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)च्या शहर सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली. यामध्ये दोन डॉक्टरांना नवीन सोनोग्राफी मशिन घेण्याची परवानगी देण्यात आली तर एका परवान्याच्या नूतनीकरणासदेखील परवानगी देण्यात आली.
पीसीपीएनडीटीच्या शहर सल्लागार समितीची बैठक दोन जणांना नवीन सोनोग्राफी मशिन : काहींचे नूतनीकरण
जळगाव : गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)च्या शहर सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी झाली. यामध्ये दोन डॉक्टरांना नवीन सोनोग्राफी मशिन घेण्याची परवानगी देण्यात आली तर एका परवान्याच्या नूतनीकरणासदेखील परवानगी देण्यात आली. मनपाच्या छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी तथा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी डॉ. राधेश्याम चौधरी होते. दोन जणांना नवीन सोनोग्राफी मशिन...या बैठकीत डॉ. सपना कोचर आणि डॉ. सुधीर नारखेडे यांना नवीन सोनोग्राफी मशिन घेण्याची परवानगी देण्यात आली. तसेच डॉ. वैशाली चौधरी यांना नूतनीकरणाची आणि डॉ. सुदर्शन नवाल यांच्या रुग्णालयाच्या दुरुस्तीच्या कामामुळे त्यांना सोनोग्राफी मशिन हलविण्याची परवानगी देण्यात आली.