शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

PCO : जगण्यात जान नाही, लाइफ कण्ट्रोलमध्ये नाही असं वाटतंय? मग तुम्हाला पीसीओची गरज आहे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 17:27 IST

रोज सकाळी उठल्यावर फक्त या 3 गोष्टी करा, लाइफ में जान आ जाएगी!

ठळक मुद्देरोजचा दिवस आपल्यासाठी एक संधी असते, आपण काल आणि आजचा विचार करत ती वाया घालवतोय का?

टेलीफोन बुथचे पीसीओ अर्थात पब्लिक कॉल ऑफिस आपल्याला माहिती आहेत. पण हे पीसीओ ते नाही. हे प्रकरण वेगळं आहे. रोज सकाळी उठल्यावर करायची ही त्रिसूत्री. ती जर आपण नीट जगू लागलो तर आपलं आयुष्य बदलून जाऊ शकतो. जगभरात जे जे यशस्वी लोक ते ते या पीसीओच्या वाटेनं गेलेले दिसतात. कधी ठरवून कधी न ठरवता, जगण्याची शिस्त म्हणून. आपल्या जगण्याला ती शिस्तच नसते आणि घोळ होतो तो तिथेच. आपण काहीच ठरवत नाही. आपल्याला काही ठरवता येत नाही आणि ठरवण्याची उमेद असली तरी जगण्यावर आपला कण्ट्रोल आहे असं आपल्याला वाटत नाही. तुम्हाला तसं वाटत असेल तर तुम्हाला ही पीसीओ नावाची जगण्याची आनंदी चावीच सापडलेली नाही असं समजा. आणि लाइफमध्ये जान आणायची असेल तर ही पीसीओची थ्री डायमेन्शन त्रीसुत्री जगायला लागा. आणि विचारा की हे पीसीओ नक्की काय आहे?

पीसीओ म्हणजे पर्पज ( हेतू-लक्ष्य), कण्ट्रोल ( नियंत्रण), ऑप्टिमिझम ( आशा-उमेद). तेच हे पीसीओ.1) पर्पजजगण्याचं ध्येय वगैरे सोडून द्या. सकाळी उठताच स्वतर्‍ला विचारा की, आजचा दिवस जगायचं आपलं लक्ष्य काय? आजच्यापुरता विचार करा. आजच्यापुरतं जगण्याचं पर्पज शोधा. दिवस मावळेर्पयत ते पर्पज पूर्ण कसं होतं, याचा विचार करा. आणि जग बदलून टाकायचं नाही, आज पाणीपुरी खायची एवढंच ठरवलं तर ते तुमचं लक्ष्य. निदान ते पूर्ण होइल यासाठी कामाला लागा.2) कण्ट्रोलपर्पज ठरलं की मग विचारा की ते करण्यासाठी माझ्या हातात काय काय आहे. जिंदगीच्या गाडीचा कुठला कण्ट्रोल माझ्या हातात आहे. मला शक्य काय आहे. जे अशक्य ते सोडून द्या. त्याचा विचार करु नका. जे शक्य त्याचा कण्ट्रोल हातात घ्या. गोष्टी कागदावर लिहा. कामाला लागा.3) ऑप्टिमिझमआशा, उमेद. काहीच खरं नाही. मला काहीच जमणार नाही. हे रडगाणं सोडा. जे ठरवलं, ते कसं करायचं याचा विचार केला की ते होऊ शकेल, जमेल अशी आशा वाटते. ते काम पूर्ण झालं की आनंद वाटतो. आपण जे ठरवलं ते होतंच याचा अनुभव एकदा यायला लागला की जिंदगीला बेलाशक भिडा. जित तो होनी ही है!