शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव; शहर उपनगरांत बीए.२.७५ व्हेरिएंटचा सर्वाधिक प्रसार

By स्नेहा मोरे | Updated: September 15, 2022 21:20 IST

कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १५ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘कोविड - १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारणाच्या १५ व्या फेरीत बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील असणारे सर्व नमुने अर्थात १०० टक्के नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. या फेरीत २८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

यासाठी जुनकीय सूत्र निर्धारण महत्त्वाचे- कोविड विषाणुंचे जनुकीय सूत्र निर्धारण केल्यामुळे एकाच विषाणुच्या दोन किंवा अधिक प्रजातींमधील फरक ओळखू येतो. ज्यामुळे या अनुषंगाने उपचार करण्याची नेमकी दिशा निश्चित करणे सुलभ होते. परिणामी, ज्या रुग्णांना कोविड बाधा झाली आहे, त्यांच्यावर अधिक परिणामकारक उपचार करणेही शक्य होते.

८४ रुग्णांनी लसीची एकही मात्रा घेतली नाही- २८८ रुग्णांपैकी १% अर्थात २ रुग्णांनी लसीची केवळ एकाच मात्रा घेतली आहे. तर ७०% अर्थात २०२ रुग्णांनी लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत. तर २९% अर्थात ८४ रुग्णांनी लसीची एकही मात्रा घेतलेली नाही.'व्हेरिएन्ट' नुसार विश्लेषण- जनुकीय सूत्रांचे निर्धारणात २८८ नमुन्यांपैकी ३७% अर्थात १०६ नमुने हे BA.२.७५ व्हेरिएन्टचे आहेत. तर ३३% अर्थात ९६ नमुने हे BA.२.७५.१ व्हेरिएन्टचे आहेत.  २१% म्हणजेच ६० नमुने हे BA.२.७५.२ व्हेरिएन्टचे आहेत.  तर २% अर्थात ६ नमुने हे प्रत्येकी BA.५.२ व BJ.१ या दोन व्हेरिएन्टचे आहेत.  एकूण ४ नमुने हे BA.२.७६ या व्हेरिएन्टचे आहेत.  तर ३ नमुने हे BA.२ या व्हेरिएन्टचे आहेत. तर २ नमुने हे BH.१ या व्हेरिएन्टचे आहेत.  तसेच BA.२.१०.४, BA.२.७४, BA.५.१, BE.१ आणि BE.३ या व्हेरिएन्टचे प्रत्येकी १ रुग्ण आहेत.रुग्णांना गंभीर लक्षणे नाहीत- २८८ रुग्णांपैकी ३२% अर्थात ९१ रुग्ण हे २१ ते ४० या वयोगटातील आहेत. तर ४१ ते ६० या वयोगटात देखील २७% म्हणजेच ७७ एवढे रुग्ण आहेत. २९% म्हणजेच ८४ रुग्ण हे ६१ ते ८० या वयोगटातील आहेत. ३% म्हणजेच १० रुग्ण हे '० ते २०' या वयोगटातील; तर ९% म्हणजे २६ रुग्ण हे ८१ ते १०० या वयोगटातील आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या २८८ नमुन्यांमध्ये ० ते १८ या वयोगटातील ७ नमुन्यांचा समावेश होता. ज्यापैकी, ३ नमुने हे ० ते ५ वर्षे या वयोगटातील आहेत, ६ ते १२ वर्षे या वयोगटात एकही नमुना आढळून आला नाही; तर ४ नमुने हे १३ ते १८ वर्षे या वयोगटातील होते. हे सर्व नमुने ‘ओमायक्रॉन’ या कोविड विषाणुच्या उप प्रकाराने बाधित असल्याचे आढळून आले. तथापि, या रुग्णांना कोविड बाधा झाल्याची कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. यातील सर्व रुग्ण १२ जून ते १ सप्टेंबर २०२२ या कालावधीतील असून सर्व रुग्ण बरे झाले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याOmicron Variantओमायक्रॉनMumbaiमुंबई