शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अगं, किती वाढतंय तुझं वजन!..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 17:27 IST

वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी केलेला व्यायाम जास्त फायदेशीर?

ठळक मुद्देवजन कमी करण्यासाठी व्यायाम करायलाच हवा.त्यासाठी सकाळपेक्षा संध्याकाळचा व्यायाम जास्त उपयुक्त.व्यायामात सातत्य मात्र असायला हवं..

- मयूर पठाडेसपाटीला गेलेलं पोट.. हे अनेकांचं स्वप्न असतं, ध्येय असतं. याच स्वप्नानं त्यांना रात्रंदिवस झपाटलेलं असतं आणि त्याचसाठी त्यांचा अट्टहास असतो. व्यायाम सुरू करणाºया बहुतांश महिला आणि पुरुषांचं पहिलं ध्येय असतं, वजन कमी करायचं आणि पोटाचा आकार घटवायचा. ज्यांचं वजन कमी आहे, पोट व्यवस्थित सपाट आहे, अशा बायकांकडे तर स्त्रिया, हिनं काय जादू केली अशा पद्धतीनंच बघत असतात. वजन आणि पोट कमी करण्यासाठी तू काय केलंस, काय करतेस, आम्हालाही त्याच्या टिप्स दे.. यासाठी हटूनच बसतात. एवढंच नाही, तर कमी वजनाच्या आणि सपाट पोटाच्या तरुणी, बायका काय, कसा व्यायाम करतात, त्या काय खातात, पितात, त्यांचं रोजचं शेड्यूल काय, हे आधाशी नजरेनं सतत टिपत असतात.मात्र आपण व्यायाम करतो की नाही आणि कोणत्या वेळेला व्यायाम करतो, यावरही तुमच्या वजनाचा काटा कुठे असेल हे ठरतं.वजन कमी करण्यासाठी कोणती वेळ चांगली आहे, सकाळची कि संध्याकाळची हे शास्त्रीय पद्धतीनं शोधून काढण्यासाठी काही शास्त्रज्ञांनी रीतसर एक पाहणीच केली. वजन कमी करण्याची इच्छा असणाºया स्त्रियांचे त्यांनी दोन गट केले. एका गटाला त्यांनी सकाळच्या वेळेला चालायला, व्यायाम करायला सांगितलं, तर दुसºया गटाला संध्याकाळी.त्यांच्या पाहणीचा निष्कर्ष रंजक होता. वजन कमी करण्यासाठी जे संध्याकाळच्या वेळी व्यायाम करीत होते, त्या महिलांचं वजन सकाळी व्यायाम करणाºया महिलांच्या तुलनेत बºयापैकी कमी झाल्याचं आढळून आलं. त्यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल, तर संध्याकाळचा व्यायाम जास्त उपयुक्त, पण लक्षात ठेवा, त्यात सातत्य मात्र असायला हवं..अर्थात संशोधक हेही सांगायला विसरलेले नाहीत, की पहिल्यांदा महत्त्व व्यायामाला. संध्याकाळी नसेल जमत, तर सकाळी का होईना पण व्यायाम नक्की करा.