शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका मुख्यालयात नो मास्क नो एन्ट्री, दंडाची कारवाई सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 11:46 IST

सावधान महापालिका मुख्यालयात जर आपण जाणार असाल तर मास्क घालूनच जा, मास्क घालणार नसाल तर पालिकेच्या ५०० रुपये दंडासाठी तयार रहा. महापालिकेकडून आता मुख्यालयात मास्क न घालणाºयांना प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

ठाणे : कोरोनाला अटकाव करण्यासाठी मास्क न वापरणाऱ्यांवर पालिकेच्या माध्यमातून कारवाई सुरु आहे. तसेच पोलीसांकडून देखील मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करुन ५०० रुपयांचा दंड आकारला जात आहे. परंतु आता महापालिका मुख्यालयात सुध्दा जायचे झाल्यास मास्क घालूनच जावे लागणार आहे. ज्यांच्या तोंडाला मास्क नसेल त्यांच्याकडून आता ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तसे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले आहेत.             कोरोनाला अटकाव करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून विविध स्वरुपाचे उपाय सुरु आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हा उत्तम पर्याय समजला जात आहे. परंतु आजही नागरीक मास्कचा वापर टाळतांना दिसतात. किंवा मास्क असुनही ते नाकाच्या खाली घालतात. अशा प्रकार महापालिका मुख्यालयात मास्क न वापरता फिरणाºयांना महापौर म्हस्के यांनी चांगलाच सज्जड दम भरला होता. शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु असतांना अशा पध्दतीने मास्क असून न वापरणे हे अयोग्य असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले होते. परंतु आता येथे येणाºया प्रत्येक नागरीकाला मास्कचे महत्व समजावे या उद्देशाने महापौरांनी आता जे मास्कचा वापर या ठिकाणी करणार नाहीत, त्यांच्यावर ५०० रुपये दंडाची कारवाई करावी असे आदेश संबधींत प्रशासनाला दिले आहेत.त्यानुसार गुरुवारी सकाळ पासून महापालिका मुख्यालयाच्या चारही गेटवर मास्क असेल त्यांनाच मुख्यालयात प्रवेश दिला जात आहे. ज्यांच्या तोंडाला मास्क दिसणार नाही. त्यांच्यावर ५०० रुपये दंडाची पावती आकारली जात आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणेला देखील खबरदारीच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुख्यालयाच्या आवारात देखील मास्क असून नागरीकांकडून ते वापरले जात नसतील तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यामध्ये नगरसेवक असतील, पालिकेचे कर्मचारी असतील किंवा अन्य कोणीही असेल त्यांनी देखील या नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे पालिकेचे अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त