नेहा पेंडसे झळकणार हिंदी मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 08:00 IST
मराठी कलाकारांच्या करिअरला सध्या चार चाँद लागलेले दिसतात. कारण अनुजा साठे हिच्यापाठोपाठ नेहा पेंडसेदेखील हिंदी मालिकेत झळकणार आहे. नटसम्राटच्या यशानंतर नेहा ‘माय कम इन मॅडम’ या मालिकेत मॅडमच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे
नेहा पेंडसे झळकणार हिंदी मालिकेत
मराठी कलाकारांच्या करिअरला सध्या चार चाँद लागलेले दिसतात. कारण अनुजा साठे हिच्यापाठोपाठ नेहा पेंडसेदेखील हिंदी मालिकेत झळकणार आहे. नटसम्राटच्या यशानंतर नेहा ‘माय कम इन मॅडम’ या मालिकेत मॅडमच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. ही मालिका पूर्णपणे कॉमेडी असणार आहे. याविषयी नेहाशी सीएनएक्स लोकमतने संवाद साधला असता, ती म्हणाली, नॅशनल चॅनलवर दिसणे ही माझ्यासाठी खूप मोठी व आनंदाची गोष्ट आहे. बालपणी मी हिंदी मालिकेत काम केले होते. या मोठ्या गॅपनंतर परत हिंदी मालिकेतल्या प्रवासासाठी जास्त एक्सायटेड आहे. तसेच एखाद्या मालिकेत सासू-सुनेची भूमिका करण्यापेक्षा एक कॉमेडी शो मिळणे यासारखा दुसरा आनंद नाही. त्याचबरोबर कॉमेडी शो करणे हा करिअरमधला टप्पा खूप इंटरेस्टेड असतो. एखाद्या कॉमेडी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मॅडमच्या भूमिकेत बॉसगिरी करताना नेहा पेंडसेच्या या हटके भूमिकेला शुभेच्छा देऊयात.