शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटका विक्री

By admin | Updated: February 2, 2016 00:15 IST

जळगाव : शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानादेखील शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटका विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यात गुटक्यावर बंदी असतानादेखील ही विक्री सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.

जळगाव : शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असतानादेखील शहरातील शाळा-महाविद्यालय परिसरात सर्रास गुटका विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे राज्यात गुटक्यावर बंदी असतानादेखील ही विक्री सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले.
शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गुटका व तत्सम पदार्थांची सवय लागू नये म्हणून शाळा व महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली. मात्र तसे चित्र शहरात नसल्याचे दिसून येते. शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालय परिसरात पान टपर्‍या असून तेथे गुटका विक्री होत असली तरी त्याकडे संबंधितांचे दुर्लक्ष (?) होत आहे.
लोकमतने शहरातील काही शाळा व महाविद्यालय परिसरात सर्वेक्षण केले असता दिसून आलेली स्थिती अशी...
मूळजी जेठा महाविद्यालय परिसरात महाविद्यालयाच्या समोर असलेल्या टपरीवर सहज गुटका मिळतो. तेथे कोणताही ग्राहक आला की त्याला सहज गुटक्याच्या पुड्या उपलब्ध होतात.
या महाविद्यालयाच्या पुढे ए.टी. झांबरे विद्यालय, ओरिऑन स्कूल, गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील विद्या मंदिर या शाळांसमोरही टपर्‍या असून तेथे गुटका सहज मिळाला.
बाहेती महाविद्यालय परिसरा जवळदेखील या पेक्षा वेगळी स्थिती नव्हती. तेथे एका टपरीवर गुटका उपलब्ध झाला.
या व्यतिरिक्त प.न. लुंकड शाळा परिसरातही एका टपरीवर गुटका मागितला असता तेथे मिळाला मात्र दुसर्‍या टपरीवर गुटका नसल्याचे सांगण्यात आले. याशिवाय प्रगती विद्यामंदीर शाळेजवळही हीच स्थिती होती. एस.एन.डी.टी. महाविद्यालयाला लागून टपर्‍या नसल्या तरी या मार्गावर गुटक्याची विक्री होती.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, तसेच तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या समोर कधी कधी हातगाड्या लागलेल्या असतात त्यामुळे तेथे कधी गुटका मिळतो तर कधी मिळत नाही.
नूतन मराठा महाविद्यालयासमोर एका टपरीवर गुटक्याची विचारणा केली असता तेथे गुटका नसल्याचे सांगण्यात आले. तसेच आर. आर. विद्यालयाजवळही गुटका नसल्याचे सांगण्यात आले.

गुटका बंदीचेच उल्लंघन...
तसे पाहता राज्यात गुटका विक्रीवरच बंदी असताना सर्वत्र गुटक्याची सर्रास विक्री सुरू आहे. त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचेच चित्र आहे.
केवळ कारवाई...
शहर व परिसरात केवळ गुटका जप्त केल्याची अधून मधून कारवाई केली जाते. मात्र गुटका विक्रीवर नियंत्रण आणले जात नसल्याचे शहरात चित्र आहे.