शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मॅटर्निटी इन्श्युरन्सपण असतो; पण तो करताना काय लक्षात ठेवाल?

By admin | Updated: May 24, 2017 18:22 IST

गरोदरपण, बाळांतपणासाठीचा विमा घेताय, या ६ गोष्टी माहिती आहेत का?

- निशांत महाजनमेडिकल इन्श्युरन्स ही आपल्या दैनंदिन गरजेची गोष्ट बनली. इन्श्युरन्स नाही आणि आजारपणाचा खर्च मोठा ही अवस्था वाईट. पण म्हणूनच अनेकांना प्रश्न पडतो की गरोदरपणात आई आणि बाळाचा असा तेवढ्यापुरता इन्श्युरन्स करता येतो का? तर येतो. मात्र अजूनही अज्ञान असं की, असा काही इन्श्युरन्स असतो हेच अनेकांना माहिती नसतं. आणि ज्यांच्यापर्यंत एजण्ट ही माहिती आणतात तेव्हा अनेकदा अतीसामान्य चूकांमुळे ऐनवेळेस क्लेम मिळण्यात काही अडचणी येवू शकतात. त्यामुळे मॅटर्निटी इन्श्युरन्स करताना काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. आणि काळजीपूर्वक करायला हव्यात.मुख्य म्हणजे पूर्वी कुठं करत बाळंतपणात इन्श्युरन्स, आता कशाला हवेत असे काही चोचले असं मनात आणून नका. कारण आताच्या काळात बाळंतपण, त्यासाठीचा खर्च,लाइफस्टाईल डिसीज हे सारं वाढत आहे. आणि हे सारे खर्च निभवायचे तर आपल्याला इन्श्युरन्स कव्हर असणं उत्तम. फक्त आपली फसवणूक होणार नाही हे मात्र तपासून घ्यायला हवे.१) हॉस्पिटलचा सगळा खर्चगरोदरपणात हॉस्पिटलचा अर्थात ओपीडीचा खर्च, त्यावेळचं औषधपाणी, पुढे बाळंतपण, गरज पडल्यास सिझेरिअन, त्यावेळची ट्रिटमेण्ट, औषधं हे सारं या इन्श्युरन्समध्ये कव्हर झालं पाहिजे. ते होतंय ना, हे पहा.२) प्री-पोस्ट हॉस्पिटलायझेशनबाळंपणाआधीचा खर्च तर कव्हर व्हायला हवाच, पण बाळंपणानंतर पुढच्या ६० दिवसापर्यंतचा खर्चही त्या विम्यात कव्हर असणं आवश्यक आहे.

३) न्यू बॉर्न बेबी कव्हरबाळ जन्माला आल्याच्या पहिल्या दिवसापासून ते ९० दिवसापर्यंत बाळाचं हॉस्पिटलायझेशन, अन्य सर्व आजार यासाठीचं कव्हर विम्यात असणं आवश्यक आहे.४) अ‍ॅम्ब्युलन्सचा खर्चअम्ब्युलन्सचा खर्च या विम्यात कव्हर होणं आवश्यक आहे. गोष्ट छोटी वाटत असली तरी ते चेक करुन घ्याच.५) आयुष ट्रिटमेण्टगरोदरपणात आणि बाळंतपणातही अनेकजणी आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध, होमिओपथी उपचार घेतात. म्हणजे आयुष मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सेवांनाही हे कव्हर असणं आवश्यक आहे. हे पाहतानाही कव्हरचं सबलिमिट पाहणं आवश्यक आहे.६) आॅनलाइन जा, एजण्ट कशाला?कुणीतरी एजण्ट घरी येणार, आपण त्याच्याकडून पॉलिसी घेणार असं करू नका. त्यापेक्षा आॅनलाइन जा, विम्याच्या अनेक योजना दिसतील, त्यांचा अभ्यास करा, माहिती घ्या. आणि मग विमा घ्या.