शहरं
Join us  
Trending Stories
1
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
2
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
3
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
4
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
5
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
6
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
7
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
8
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
9
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
10
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
11
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
12
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
13
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
14
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
15
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
16
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय
17
महासंचालकांचे परिपत्रक सर्व पोलिसांवर बंधनकारक नाही का?; अपूर्ण केस डायरीवरून उच्च न्यायालय संतापले
18
मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; अंबाजोगाईच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार
19
‘आई’ व्हा! शाळकरी मुलींनाही 'या' देशानं दिलं आमिष; मुलं जन्माला घातली तर मिळणार १ लाख
20
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...

शेजारच्याच्या कम्प्युटरमध्ये डोकावता?- तुम्हाला माफी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2017 14:24 IST

आॅफिसात सतत दुसऱ्याच्या स्क्रिनवर नजर ठेवणाऱ्या भोचकांचं करायचं काय?

- नितांत महाजनआॅफिस एटिकेट्स नावाचा एक प्रकार असतो, आणि तो अनेकांना माहितीच नसतो. त्यामुळे त्यांचा वेंधळेपणा, भोचकपणा हा बाकीच्या कलिग्जना आगाउपणा आणि उद्धटपणा वाटतो. आपल्या कामातला अडथळा तर वाटतोच, याशिवाय ते आपल्या प्रायव्हसीचा भंग करताहेत, आपल्या कामात नाक खुपसताहेत असं वाटतं. खरंतर हे मान्य करायला हवं की आपले कलिग्न हे आॅफिसात तरी आपले कलिग्ज, सहकारीच असतात. मित्र नसतात. मित्र असलेच तर आॅफिसच्या बाहेर. त्यामुळे आपलं काम सोडून त्यांच्या कम्प्युटरमध्ये घुसून वाचू नये. ते आपल्या स्क्रिनवर काही लिहित असतील तर आपलं कामधाम सोडून तेच वाचत बसू नये. तसं तुम्ही करत असाल तर तुमच्याविषयी नाराजी वाढतेच. तुमचा त्रास होतोच इतरांना मात्र तुमच्यासंदर्भातही काही ठोकताळे नव्या जगात लावता येवू शकतात. आणि तसंच खरंच तुमचं व्यक्तिमत्व असेल तर नव्या काळात टीममध्ये काम करणं आणि यशस्वी होणं तुम्हाला अवघड जावू शकतं.तपासून पहा तुम्ही हे करता का?सतत लक्ष दुसऱ्याच्या स्क्रिनकडे? तुमचं कामात लक्ष नाही..असं काही आहे का की आपलं आपल्याच कामात लक्ष नाही. आपल्या कामात मन रमत नाही. ते काम आपल्याला धड येत नाही म्हणून मग दुसरा त्याच्या स्क्रिनवर काय लिहितो हे आपण चोरचोरुन वाचत असतो?

 

आत्मविश्वास कमीतुमचा आत्मविश्वास कमी आहे का? आपलं काम मस्तच होतं आहे, आपलं काम वरचढ ठरणार आहे यावर तुमचाच विश्वास नसतो का? तो नसेल तरी तुम्ही याचं त्याचं काम पाहत बसता?इनसिक्युअर्ड आहात?तुम्हाला स्वत:लाच असुरक्षित वाटत असेल, तुम्ही आतून इनसिक्युअर्ड आणि भेदरलेले असाल तरी कामाकडे, स्वत:कडे लक्ष न देता, इतरांकडे, त्यांच्या कामाकडे, पेहरावाकडे, पोषाखाकडे, आॅफिस गॉसिपकडे तुमचं जास्त लक्ष असतं. ती इनसिक्युरिटी आहे का तुमच्या मनात, तपासा.भोचक आहात?भोचकपणा आणि उत्सकुता यात एक पुसटशी रेष असते. ती क्रॉस केली की भोचकपणा सुरु होतो. जो इतरांना त्रासदायक वाटतो. आणि मग लोक तुम्हाला टाळायला लागतात.सॉफ्टस्किल्सचा अभावआपल्याकडे आॅफिस स्किल्स, सॉफ्ट स्किल्स यांचा अभाव आहे. कार्यालयीन कामात दुसऱ्यांना अनावश्यक प्रश्न विचारू नयेत. त्यांच्या कम्प्युटरच्या स्क्रिनकडे पाहू नये, त्यांचा मोबाईल उचलू नये, फोन कुणाचा हे पाहू नये, मोबाइलवर कुणी बोलत असेल तर ते कान देवून ऐकू नये, दुसऱ्याच्या मेलबॉक्सवर नजर ठेवू नये हे साधे नियम. पण तेच माहिती नसल्यानं, सॉफ्टस्किल्सचा अभाव असल्यानं टीमला एक चुकीचा मेसेज जातो. आणि लोक अशा भोचक, घुसखोरीकरणाऱ्या सहकाऱ्यांना टाळायला लागतात.