शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
3
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
4
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
5
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
6
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
7
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
8
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
9
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
10
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
11
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
12
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
13
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
14
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
15
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
17
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
18
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
19
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
20
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

दूधदानासाठी स्तनदा माता घेताहेत पुढाकार ! आशियातील पहिल्या मानवी दूधपेढीतील डॉक्टरांची माहिती

By संतोष आंधळे | Updated: August 1, 2022 07:31 IST

आशियातील पहिली मानवी दूधपेढी डॉ अर्मिदा फर्नाडिस यांनी सायन रुग्णालयात स्थापन केली. रुग्णालयात बाळंतीण महिला शिशूला दूध पाजल्यानंतर अतिरिक्त दूध या पेढीला दान करतात.

- संतोष आंधळेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : विविध वैद्यकीय कारणांमुळे काही मातांना नवजात शिशूंना दूध पाजण्यास अडचणी निर्माण होत असतात, दूधदानासाठी स्तनदा माता पुढे येत असल्याने अशा शिशूंना मानवी दूधपेढीतून दूध दिले जात आहे. 

आशियातील पहिली मानवी दूधपेढी डॉ अर्मिदा फर्नाडिस यांनी सायन रुग्णालयात स्थापन केली. रुग्णालयात बाळंतीण महिला शिशूला दूध पाजल्यानंतर अतिरिक्त दूध या पेढीला दान करतात. वैद्यकीय कारणामुळे काही मातांना प्रसूतीनंतर त्यांच्या मुलांना दूध देण्यास अडचणी निर्माण होतात, तर काहींना उशिरा दूध आल्यामुळे त्यांच्या शिशूंना दूध देता येत नाही. या पेढीच्या स्थापनेनंतर २०१३ साली प्रथम खासगी रुग्णालयांमध्ये बाळंतीण झालेल्या स्तनदा मातेने स्वतःहून पुढे येऊन दूध दान केले होते. दूधदानाची जनजागृती वाढल्यानंतर माता पुढे येण्याचा ओघ वाढला असून सध्या ५०-६० माता वर्षाला दूध दान करतात.

मातेने दान केलेल्या दुधाची संपूर्ण वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ते योग्य असेल तरच पेढीत जमा केले जाते. तसेच ज्या महिला हे दूध दान देणार आहेत, त्याच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जातात. त्याचप्रमाणे या पेढीमध्ये वर्षाकाठी  सुमारे आठशे ते बाराशे लीटर दूध संकलित केले जाते.  - डॉ. जयश्री मोंडकर, माजी अधिष्ठाता, सायन रुग्णालय. 

अतिरिक्त दूध दान  करण्याचे आवाहन अनेक स्तनदा मातांनी आपल्या बाळाला पुरेसे दूध दिल्यानंतर अतिरिक्त दूध दान केले पाहिजे. यामुळे जी बालके दुधामुळे वंचित असतात त्यांना याचा वैद्यकीय दृष्टीने खूप फायदा होतो. जनजागृतीमुळे सायन रुग्णालयाशिवाय काही खासगी रुग्णालयात प्रसूती झालेल्या स्तनदा माता दूधदानासाठी पुढे येत आहे. मात्र हा आकडा वाढण्याची गरज आहे, असे सायन रुग्णालयाच्या नवजात शिशु विभागाच्या डॉ. स्वाती मणेरकर यांनी सांगितले.