शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरला मारहाण रुग्णाच्या नातेवाईकाला केली अटक

By admin | Updated: July 6, 2015 23:34 IST

मुंबई: मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने तिथल्या डॉक्टरला शिवीगाळ केली, त्याचा गळा पकडला. नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी जे.जे. रुग्णालयात घडला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली.

मुंबई: मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकाने तिथल्या डॉक्टरला शिवीगाळ केली, त्याचा गळा पकडला. नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनाही शिवीगाळ केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी जे.जे. रुग्णालयात घडला. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली.
जे.जे.रुग्णालयात सोमवारी नेत्रचिकित्सा विभागात ६७ रुग्ण दाखल झाले. नेत्रचिकित्सा पुरूष वॉर्डमध्ये ४८ खाटा आहेत. जास्त रुग्ण आल्यामुळे काही रुग्णांना थांबण्यास सांगितले होते. ६ रुग्णांना जागा नसल्यामुळे जेवण, औषध देऊन बसण्यास सांगितले होते. यापैकी एकाच्या नातेवाईकाने डॉ. वफी अन्सारी यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. आम्हाला जागा द्या, काय चालले आहे, असे तो मोठ्या आवाजात बोलू लागला. जेव्हा डॉ. वफीने मी देतो, थोड शांत व्हा, सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नातेवाईकाने त्याचा गळा पकडला. यानंतर नेत्रचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख वॉर्डमध्ये गेल्यावर त्यांना शिवीगाळ केली. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनाही शिवीगाळ केली.
रुग्णाच्या नातेवाईकाने कशाप्रकारे डॉक्टराचा गळा पकडला, शिवीगाळ केली म्हणून त्याच्या विरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. नातेवाईकावर भादवि ३५३, ५०४, ५०६ आणि डॉक्टर संरक्षण कायदा २०१०, कायदा कलम ४ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असल्याची माहिती डॉ. लहाने यांनी दिली.