शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बाळंतपणानंतर पिझा खात वजन कमी करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 17:17 IST

बाळंतपणानंतरच्या आहाराचा सुक्ष्म विचार आपल्या पारंपरिक पद्धतीत दिसतो, ते नाकारुन आपण काय स्वीकारतोय?

ठळक मुद्देसेलिब्रीटी मॉम बारीक होतात, म्हणून आपणही तेच करावं असं नाही, आणि करायचं ठरवलंच तर निदान अतिरेक तरी टाळायलाच हवा.

- नेहा नाशिककर

आपल्याही नकळत माध्यमं आपली विचारप्रक्रिया घडवतात. आपल्या वर्तनावर प्रभाव टाकतात. आणि  आपण नकळत त्यासार्‍यात वाहून जातो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणार्‍या स्टार महिलांच्या आई होण्याच्या आणि त्यातून लगेच वजन घटवून कामाला लागण्याच्या बातम्या. अशा बातम्या देताना काही भान ठेवावं का, याविषयी बोलण्यात काही हाशील नाही. पण त्या बातम्या वाचून स्वतर्‍वर आणि बाळावर अन्याय करणार्‍या अनेकींनी मात्र काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. कारण  बाळंतपणानंतर लगेच वजन घटवून अतीश्रम करण्याची घाई आरोग्याला बरी नाही.होतं काय करीना कपूरने बाळंतपणानंतर इतके किलो वजन घटवले, सोहा खान ने तितके, राणी मुखर्जी बॅक इन शेप, शिल्पा शेट्टीने तर काय फिगर कमावली अशा बातम्या वर्तमानपत्र, अनेक वेबसाईटस, टीव्हीवाले हमखास दाखवतात. आणि घरबसल्या त्या बातम्या वाचून अनेकजणी स्वतर्‍वर प्रयोग करू लागतात. बाळंतपणानंतर वाढलेलं वजन कमी व्हावं आणि आपणही (इतरांनी ठरवलेल्या) सौंदर्यमापात जाऊन बसावं असं वाटू लागतं.मात्र त्यानं आपल्या बाळावर काय परिणाम होईल, आपल्या शरीरावर काय परिणाम होइल याचा मात्र विचार केला जात नाही. आणि डाएट सुरू होतं. जीम लावलं जातं. खाणं कमी केलं जातं. मूल अंगावर पीत असताना हे सगळे उद्योग म्हणजे त्या मुलाचंही पोषण न करणं आणि आपलंही.केवळ दिसणं हे सौंदर्य नसतं तर बाळांतपणानं झालेली शरीराची झीजही भरुन यायला हवी. आपल्या बाळंतपणाच्या पारंपरिक आहारात हा विचार केलेला आहे.मात्र वजन वाडेल या भितीनं अनेकजणी पौष्टिक अन्न खात नाहीत. दूध पित नाही. आराम करत नाहीत.अतीच व्यायामाला लागतात. परिणाम म्हणून पचन बिघडतं. हाडं कुरकुरकुरायला लागतात. हे टाळा, किमान करीना कपूर बाळंतपणात गुळ भाकरी, तीळाची, जवसाची चटणी खात होती हे जरी लक्षात ठेवलं तरी पुरे!दुध भाकरी, खिचडी, तूप, जवसाची चटणी, सूर्यनमस्कार घालणारी करीना विसरुन चालणार नाही. आणि आधुनिकतेच्या नावाखाली पारंपरिक आहारविचार बाजूला ठेवून बाळंतपणानंतर पिझा खाणंही फार बुद्धीमत्तेचं लक्षण नाही, हे एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपलं शरीर आपले आभार मानू शकेल!