शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

​फिटनेस राखण्याचा मजेशीर उपाय : झुंबा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2017 18:11 IST

रोज एकाच प्रकारचा व्यायाम करणे तुम्हांला कंटाळवाणे वाटत असेल तर इतरही काही मजेशीर प्रकारांमधून तुम्ही तुमचा फिटनेस मेन्टेंट ठेऊ शकता. ‘झुंबा’ हा असाच एक मजेशीर वर्कआऊट प्रकार.

बदलत्या जीवनशैलीनुसार आज लहानांपासून ते वृद्धांपासून सर्वांचे जीवन तणावग्रस्त आणि धावपळीचे झाले आहे. अशावेळी स्वत:च्या फिटनेसकडे आवर्जून लक्ष देण्यासाठी जिम, योगा, ध्यान यांची मदत घेतली जाते. मात्र रटाळ आणि रोज एकाच प्रकारचा व्यायाम करणे तुम्हांला कंटाळवाणे वाटत असेल तर इतरही काही मजेशीर प्रकारांमधून तुम्ही तुमचा फिटनेस मेन्टेंट ठेऊ शकता. ‘झुंबा’ हा असाच एक मजेशीर वर्कआऊट प्रकार.झुंबा हा एक प्रकारचा कार्डिया वर्कआऊट आहे. जीममधल्या एकाच प्रकारच्या व्यायाम प्रकाराने लोकं कंटाळली आहेत. पण ‘झुंबा’ हा आधुनिक युगातील एक मजेशीर वर्कआऊट प्रकार आहे. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या संगीतामध्ये ४०-४५ मिनिटं तुम्ही सतत मुव्हमेंट करत असता. यावेळी तुमच्याही नकळत आणि आनंद घेताघेता कॅलरीज बर्न होत असतात. वर्क आऊट करताना तुमचा हार्ट रेटही सुधारतोय. त्यामुळे रटाळ व्यायामप्रकारांऐवजी मजा करत फिटनेस मेंटेंन्ट करणं लोकांना अधिक सोयिस्कर वाटतय म्हणून ते कमीत कमी वेळात अधिक पॉप्युलर होतयं. झुंबा हा ‘फन वर्कआऊट’ आहे. त्यामुळे नक्कीच केवळ विशिष्ट समस्येशी ते सीमीत नसते. सकाळपासून कामाला सुरवात झाली की संध्याकाळपर्यंत सहाजिकच आपण मानसिक किंवा शारिरीकरित्या थकतो. अशावेळी झुंबा सारखी ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटी करताना तुम्ही अनेकांना भेटता. यामुळे ताण-तणाव हलका होतो. तसेच ड्रीप्रेशन सारख्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या समस्यांदेखील दूर होतात. झुंबा हा कार्डिया वर्कआऊट असल्याने शरीरातील कॅलरीज कमी होतात. त्यामुळे वजन आटोक्यात राहते. तसेच बारीक असणाऱ्यांसाठी ‘झुंबा टोनिंग’ या प्रकारामुळे शरीर टोन मध्ये ठेवण्यास मदत होते.व्यायाम किंवा फिटनेस हा साऱ्याच वयातील लोकांना आवश्यक असतो. मग झुंबासाठी वयाचे बंधन नाही. लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सारेच ‘झुंबा’ करू शकतात. त्याला वयाचं बंधन नाही. परंतू तुमच्या शारीरिक व्याधीनुसार त्याची तीव्रता आणि प्रकार तुम्ही निवडू शकता. हा केवळ एक गैरसमज आहे. एखाद्या पार्टीमध्ये आपण जसे ‘मनसोक्त’ आणि बिनधास्त नाचतो. तसेच ‘झुंबा’ करतानादेखील तुम्हांला डान्स करता येतो की नाही. हे बंधन मूळीच येत नाही.जसे झुंबाला वयाचं बंधन नसतं तसंच व्याधींचं बंधन नसतं. पण शारिरीक अवस्थेनुसार झुंमा ट्रेनर गरोदर स्त्रियांना योग्य प्रकार सुचवतात. त्यामुळे गरोदरपणात आणि त्यानंतरही वजन आटोक्यात ठेवण्यासाठी ‘झुंबा’ अगदी फायदेशीर आहे. बेली डान्सदेखील गर्भारपणानंतर वजन घटवण्याचा हेल्दी उपाय आहे.