शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

मुलाच्या प्रतीक्षेत होतेय लोकसंख्येत वाढ

By admin | Updated: July 11, 2015 00:15 IST

मुलाच्या प्रतीक्षेत होतेय लोकसंख्येत वाढ

मुलाच्या प्रतीक्षेत होतेय लोकसंख्येत वाढ
-मुलगाच हवा या अट्टहासापोटी तीन-चार अपत्यांना दिला जातो जन्म
-आज जागतिक लोकसंख्या दिन

नागपूर : देशात चार वर्षांपूर्वी ११.६६ टक्के असलेला जन्मदर १० टक्यांवर आणण्याचा शासनाचा निर्धार आहे. यासाठी शासनस्तरावरून विविध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. एका बाजूला गाडी, बंगला अशी ऐषोआरामाची जीवनपद्धती, तर दुसरीकडे दारिद्र्य, एक वेळची भूक भागविण्याची धडपड, असे आजचे चित्र दिसते. ही स्थिती बदलण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण हाच एकमेव उपाय आहे. असे असताना आजही कुटुंबांचा वंश वाढायचा, तर मुलगाच हवा, या फाजील अट्टाहासातून दोनपेक्षा अधिक अपत्य जन्मला घालत आहे.
जगभरात ११ जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम भारतातही जाणवत आहेत. लोकसंख्यावाढ ही समस्या उग्र रूप धारण करीत असल्याने विकासकामांना खीळ बसत आहे. लोकांना मूलभूत गरजा देतानाही कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे.
१९४७ ते १९८१ या ४१ वर्षांत देशाच्या लोकसंख्येत ३४ कोटींची भर पडली. परंतु त्यापुढील १८ वर्षांतच ही वाढ ३२ कोटी इतकी प्रचंड झाली. त्यामुळेच या सर्व कालावधीत सर्वच पंचवार्षिक योजनांद्वारे भारताने गाठलेल्या विकासाचा काहीही उपयोग झाला नसल्याचे दिसून येते. यामुळेच लोकसंख्येच्या भस्मासुराला गाडण्यासाठी सर्वांनीच हातात हात घालून काम करणे आवश्यक झाल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. यासाठीच शासनाने वैयक्तिक लाभासाठी पात्रता ठरविताना फक्त छोटे कुटुंब (२ अपत्य) संकल्पना अमलात आणली. यात छोटे कुटुंब शासकीय सबसिडीस पात्र, घरबांधणी अग्रीम, वाहन अग्रीम अशा सवलतींसाठी कुटुंब मर्यादित ठेवण्याऱ्या शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील एखाद्या कुटुंबाने एकच मुलगी असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे १० हजार रु पये रकमेची मुदतठेव, दोन मुलींनंतर अशी शस्त्रक्रिया केल्यास दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी पाच हजारांप्रमाणे एकूण १० हजार रु पये १८ वर्षांसाठी मुदतठेव अशी सुधारणा केली आहे. या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या असतानाही काही कुटुंब मुलगाच हवा यासाठी तीन-चार अपत्यांना जन्म देत आहे. अशिक्षित महिला असलेल्या कुटुंबासह सुशिक्षित तर काही डॉक्टर कुटुंबातही अशा पद्धतीने लोकसंख्या वाढीची बीजे दिसून येत आहेत.