शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

हसमुख जोडीदारामुळे वाढते आरोग्य आणि आयुष्यमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 16:00 IST

हसमुख जोडीदारामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनतो ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

हसमुख आणि मनाने आनंदी राहणारा जोडीदार असेल तर आपले आरोग्य तर सुधारतेच, सोबत आनंद द्विगुणित होऊन आयुष्यमान वाढते. संशोधकांनी केलेल्या एका अध्ययनानुसार आनंदी आणि हसमुख जोडीदारामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक सकारात्मक आणि आनंददायी बनतो ज्यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.‘मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी’ येथील सहायक प्राध्यापक विल्यम चॉपिक यांनी माहिती दिली की, आमच्या अभ्यासातून आनंद आणि आरोग्य यांचा परस्पर संबंध कसा असतो यावर अधिक प्रकाश टाकण्यात आला आहे. नातेसंबंध आणि जोडीदाराचा आपल्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचासुद्धा यामध्ये विचार करण्यात आला आहे.प्रस्तुत संशोधनात १९८१ मध्यम-वयीन जोडप्यांचा सामावेश करण्यात आला होता. अध्ययनाअंती निष्कर्ष निघाला की, ज्यांचे जोडीदार अधिक आनंदी असतात त्यांचे आरोग्य वयानुरूप अधिक चांगले असते. एकमेकांच्या साथीने दोन्ही जोडीदार ‘आनंद निर्देशांकावर’ चांगले गुण मिळवतात.आनंदी लोकांचे आरोग्य चांगले असते, असे पूर्वी करण्यात आलेल्या विविध संशोधनातून दिसून आलेले आहे. परंतु यापुढे एक पाऊल जात चॉपिक व सहकाऱ्यांनी जोडीदारासोबत असलेल्या नात्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला.ते सांगतात की, आनंदी जोडीदार आपल्याला अधिक बळकट सामाजिक आधार देतात (जसे की, काळजी घेणे). उलटपक्षी नाखुष किंवा असमाधानी जोडीदार केवळ वैयक्तिक तणावावर लक्ष केंद्रित करतात. अशा स्थितीतच आनंदी जोडीदार फार गरजेचा असतो.कारण ते आपल्याभोवती आरोग्यास पोषक असे वातावरण निर्माण करतात. झोपेचे टाईम मॅनेजमेंट, सकस आहार, व्यायाम, व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा देणे यापद्धतीने ते आपल्या चांगल्या आरोग्यास कारणीभूत ठरतात.संशोधनात ५० ते ९४ वयोगटातील जोडप्यांची सहा वर्षांच्या कालावधीत आनंद, वैयक्तिक आरोग्य आणि शारीरिक हालचाल याविषयी माहिती गोळा करण्यात आली होती. ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’ने त्याचे निष्कर्ष ‘हेल्थ सायकोलॉजी’ या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत.