शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईनची लक्षणे आढळल्यास औषधे सुरु करा! तपासणीसाठी वेळ घालवू नका, औषधे घ्या गरज असल्यासच करा तपासणी

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

मुंबई: स्वाईन फ्लूचा संसर्ग प्राथमिक पातळीवर असल्यास तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. एक- दोन दिवस लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा औषधोपचार वेळीच सुरु करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वाईनचा संसर्ग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टरांनी सरसकट सर्वांच्या तपासण्या करु नयेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. ...


मुंबई: स्वाईन फ्लूचा संसर्ग प्राथमिक पातळीवर असल्यास तपासणीशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. एक- दोन दिवस लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तपासणी करण्याची आवश्यकता नाही. त्यापेक्षा औषधोपचार वेळीच सुरु करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्वाईनचा संसर्ग कमी होण्यास मदत होते. त्यामुळे डॉक्टरांनी सरसकट सर्वांच्या तपासण्या करु नयेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
मुंबईसह राज्यात फैलावत असलेल्या स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागातर्फे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात आला. आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी पुण्यातील आरोग्य अधिकार्‍यांशी संवाद साधला. यावेळी स्वाईन फ्लू संदर्भात काही विषयांवर चर्चा करण्यात आली. आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिलेल्या आदेशानुसार ही बैठक झाली.
स्वाईन फ्लूच्या रुग्णांची ए, बी आणि सी अशी विभागणी करण्यात आली आहे. मुंबईतील खासगी लॅबमध्ये अनेकजण स्वाईन फ्लूची तपासणी करुन घेत आहेत. पण, ज्या व्यक्तींना एकच दिवस ताप, सर्दी, खोकला आहे. अथवा दोन-तीन दिवस कमी ताप, सर्दी खोकला असलेले रुग्ण ए आणि बी कॅटेगरीमध्ये मोडतात. या रुग्णांना तपासणीची आवश्यकता नाही. या रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन औषधे सुरु केल्यास त्यांचा संसर्ग वाढत नाही. उलट त्यांचा आजार बरा होण्यास मदत होते. यामुळे पुढच्या काही दिवसांतच स्वाईनच्या तपासणीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे आखण्यात येणार आहेत, असे या बैठकीत ठरवण्यात आले.
एखाद्या व्यक्तीला स्वाईनची लक्षणे असल्यास त्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. लक्षणे आढळल्यास त्यावर त्वरित डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार सुरु करावेत, या प्रकारची जनजागृती राज्यात गणेशोत्सवादरम्यान करण्यात यावी याविषयी पुण्याच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली. याचबरोबर स्वाईनची तपासणी कशी करावी, कोणत्या पद्धतीने उपचार करावेत, रुग्णांची काळजी कशी घ्यावी, याविषयी या बैठकीत चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)
............................
(चौकट)
३७५ गर्भवती महिलांना दिली लस
स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. हे लक्षात घेऊन गर्भवती महिलांना स्वाईन फ्लूची लस दिली जात आहे. आत्तापर्यंत ३७५ गर्भवती महिलांना स्वाईनची लस देण्यात आली आहे.
............................