शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लठ्ठ असाल किंवा अशक्त.. नैराश्य तुमचं बोट धरुन येणारच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 15:22 IST

कुठल्याही प्रकारच्या अतिरेकापासून वाचवा स्वत:ला..

ठळक मुद्देज्या महिला लठ्ठ किंवा अशक्त असतात, त्यांना नैराश्याच्या समस्येचा जास्त तीव्रतेनं सामना करावा लागतो..यातली आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे काही जण अगोदर तंदुरुस्त असतात, पण बारीक होण्याच्या हव्यासापायी ते स्वत:ला आपणहून रुग्ण बनवून घेतात.त्यामुळे त्यांना अशक्तपणा येतो आणि अर्थातच त्यानंतर विविध विकार सोबतीला येतात.

- मयूर पठाडेकोणाला जाड व्हायचं असतं, तर कोणाला बारीक व्हायचं असतं. जाड होणं म्हणजे शब्दश: जाड आणि लठ्ठ होणं नव्हे. पण अनेक कारणांनी काही जण खूप बारीक असतात. त्यांच्यात अशक्तपणा असतो. हा अशक्तपणा त्यांच्या आयुष्यावर, लाइफस्टाइलवर आणि त्यांच्यातील क्षमतेवरही परिणाम करीत असतो. त्यामुळे त्यांना आपलं वजन वाढवण्याचा सल्ला डॉक्टर मंडळी बºयाचदा देतात.आणि बहुतांश जणांना तर बारीक होण्याच्या मानसिकतेनं पछाडलेलं असतं. काहीही करुन त्यांना बारीक व्हायचं असतं. थोडं कुठे दोन घास जास्त खाल्ले गेले किंवा गोड खाण्यात आलं, की लगेच त्यांचे डोळे भितीनं गरगरायला लागतात, छातीत धडधड व्हायला लागते.. आपलं वजन आता वाढलं तर नाही?..यासंदर्भात नुकतंच एक संशोधन झालंय.. अर्थात यापूर्वी अशा प्रकारचे बरेच अभ्यास करण्यात आले असले तरी यावेळच्या अभ्यासाचं वेगळेपण म्हणजे तुम्ही लठ्ठ असाल किंवा अशक्त असाल.. तर तुम्हाला नैराश्य येऊ शकतं. म्हणजे मुळातच अशा लोकांना त्या चिंतेनं भेडसावलेलं असतं, पण शास्त्रीय दृष्ट्याही त्यामुळे तुम्हाला नैराश्य येण्याचं प्रमाण वाढू शकतं.नुकत्याच झालेल्या या अभ्यासाचा आणखी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे महिलांच्या बाबतीत हे जास्त खरं आहे. ज्या महिला लठ्ठ किंवा अशक्त असतात, त्यांना नैराश्याच्या समस्येचा जास्त तीव्रतेनं सामना करावा लागतो..त्यामुळे कोणीही या टोकाच्या गोष्टीपासून आपल्याला सावरावं. यातली आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे काही जण अगोदर तंदुरुस्त असतात, पण बारीक होण्याच्या हव्यासापायी आणि त्यासाठी स्वत:वर केलेल्या निरनिराळ्या प्रयोगांमुळे ते स्वत:ला आपणहून रुग्ण बनवून घेतात. त्यामुळे त्यांना अशक्तपणा येतो आणि अर्थातच त्यानंतर विविध विकार.त्यामुळे अशा दोन्ही प्रकारांपासून स्वत:ला वाचवा.