शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नर्व्हस झालात, अस्वस्थ वाटायला लागलं तर करून पाहा हे सोप्पे उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 16:32 IST

थोड्याच वेळात तुमचा मूड होईल नॉर्मल!

ठळक मुद्देतुम्हाला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं, नर्व्हस वाटायला लागलं, तर आपल्याला कुठल्या तरी चिंतेनं ग्रासलं आहे, हे मान्य करा आणि सामोरं जा त्याला.या भावनेशी झगडा करू नका, त्याला प्रतिकार करू नका आणि अमान्यही करू नका. ही स्थिती क्षणैक आहे आणि थोड्याच वेळात ती जाईल असं स्वत:ला बजावा.. थोड्याच वेळात तुमचं नैराश्य आणि उदासिनता दूर होईल.ताणाच्या परिस्थितीतून बाहेर पडा. फिरायला, चालायला जा. आपल्या आवडीचं दुसरं काही तरी काम करा.

- मयूर पठाडेअनेकदा कुठल्यातरी चिंतेनं आपल्याला घेरलं जातं. अचानक अस्वस्थ वाटायला लागतं, मनातू कसली तरी भीती दाटून येते. अस्वस्थ वाटायला लागतं, नर्व्हसनेस वाढतो, अनइझी व्हायला लागतं.. काय करायचं अशावेळी?अर्थातच डॉक्टरांची मदत घेणं हा तर त्यावर सर्वोत्तम उपाय आहेच, पण बºयाचदा आपल्या या चिंतेला आपण स्वत:च आपल्यापासून दूर करू शकतो. या चिंता जशा अचानक आपल्याला घेरतात, तशाच काही मिनिटांमध्ये या अनामिक चितांना आपण पळवूनही लावू शकतो.तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटायला लागलं, नर्व्हस वाटायला लागलं, तर आपल्याला कुठल्या तरी चिंतेनं ग्रासलं आहे, हे नाकारु नका. काहीतरी आपल्याला त्रास देतंय, हे तर खरंय, मान्य करा ते आणि सामोरं जा त्याला. या भावनेशी झगडा करू नका, त्याला प्रतिकार करू नका आणि अमान्यही करू नका. या भावनेशी युद्ध छेडाल, तर आणखीच त्रास होईल. त्यापेक्षा थोडा वेळ शांत बसा. स्वत:शीच संवाद साधा. ही स्थिती क्षणैक आहे आणि थोड्याच वेळात ती जाईल असं स्वत:ला बजावा.. बघा खरोखरच थोड्याच वेळात तुमचं नैराश्य आणि उदासिनता दूर होईल. अर्थातच लक्षात ठेवा, ही अस्वस्थता कशामुळे आहे, हे आपल्याला बºयाचदा स्वत:चं स्वत:लाच कळतं. हे कारण काही तरी फुटकळ आहे की गंभीर, तेही बºयाचदा लक्षात येतं. तसं नाही आलं लक्षात, तर मग मात्र डॉक्टरी सल्ला केव्हाही श्रेयस्कर.तणावावर, चिंतेवर मात करण्याचा आणखी एक उत्तम उपाय म्हणजे ताणाच्या परिस्थितीतून बाहेर पडा. फिरायला, चालायला जा. दुसरं काही तरी काम करा. काहीतरी गंमतीशीर वाचा, पाहा. मोबाइलमधले फनी व्हीडीओज थोडा वेळ पाहा. ज्या गोष्टी केल्यामुळे आपल्याला बरं वाटतं, असं काहीतरी करा. तणाव निर्माण करणाºया त्या परिस्थितीतून स्वत:ला पूर्णपणे बाहेर काढा. थोड्याच वेळात तुमचा मूड नॉर्मल होईल..