शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्थिक टेन्शन्स जास्त असतील, तर हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो तब्बल १३ पटींनी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 15:22 IST

आर्थिक ताणापासून सुटका करण्यासाठी प्रत्येकानं स्वत:ला ठेवावं तयार..

ठळक मुद्देज्यांना आर्थिक ताण आहे, अशा लोकांना हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका तब्बल १३ पटींनी वाढतो.इतर कुठल्याही कारणापेक्षा आर्थिक कारणानं हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण सर्वाधिक.आर्थिक ताणावर वेळीच प्रतिबंधक उपाय प्रत्येकानं योजले पाहिजेत.

- मयूर पठाडेसमजा तुमच्या छातीत थोडं दुखायला लागलं किंवा तुम्हाला खरोखरच हृदयविकाराचा त्रास आहे, डॉक्टर तुम्हला पहिल्यांदा काय सांगतात, किंवा विचारतात?... तुम्हाला कसलं टेन्शन आहे का, तुम्ही फार टेन्शन घेता का? धुम्रपान करता का? तुमची लाइफस्टाइल कशी आहे?..डॉक्टर जे काही प्रश्न विचारतात, ते बरोबरच आहेत, पण बहुतांश कोणताही डॉक्टर तुम्हाला काही आर्थिक अडचण आहे का, किंवा आर्थिक टेन्शन्स आहेत का, असं कधी विचारत नाही..पण दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील संशोधकांनी यासंदर्भात नुकतंच एक विस्तृत संशोेधन केलं आहे. हे संशोधन सांगतं, हृदयविकाराच्या संदर्भात ज्या इतर सर्वसामान्य बाबी आपण तपसातो आणि डॉक्टरही ज्यावर भर देतात, त्यापेक्षाही अशा पेशंट्सची आर्थिक हिस्ट्री.. अर्थातच आर्थिक कारणांमुळे त्याला काही ताण आहेत का, हे तपासलं पाहिजे. त्याकडे वेळीच लक्ष दिलं गेलं आणि पेशंट्सनाही त्याबाबत सावध केलं गेलं तर हृदयविकारापासून हे रुग्ण दूर राहू शकतात.यासंदर्भातील सर्वात महत्त्वाचं संशोधन म्हणजे ज्यांना आर्थिक ताण आहे, अशा लोकांना हार्ट अ‍ॅटॅक येण्याचा धोका तब्बल १३ पटींनी वाढतो. त्यामुळे आर्थिक ताणावर वेळीच प्रतिबंधक उपाय प्रत्येकानं योजले पाहिजेत. ज्यांना अजून हृदयविकार नाही, पण आर्थिक टेन्शन्स वाढायला लागल्यावर त्यासंदर्भातली काळजी वेळेत घेतली तर हृदयविकार आणि आणि हार्ट अ‍ॅटॅकपासून या रुग्णांची सुटका होऊ शकते. त्यासाठी आपल्याला आर्थिक ताण येणार नाही, याकडे शक्यतो प्रत्येकानं लक्ष द्यावं.आर्थिक गोष्टी सांगून येत नाहीत, हे खरं असलं तर त्यानं काय होऊ शकतं हे माहीत असलं तर त्यापासून बचावाचे मार्गही आपण शोधू शकतो हे त्यात सर्वाधिक महत्त्वाचं.