शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

‘ड’ चा ‘द’ झाला तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 5:56 AM

मधुमेहाचे दोन प्रकार सगळ्यांना ठाऊक असतात. टाइप १ आणि टाइप २.

- डॉ. नितीन पाटणकर, मधुमेहतज्ज्ञमधुमेहाचे दोन प्रकार सगळ्यांना ठाऊक असतात. टाइप १ आणि टाइप २. या शिवाय गरोरदरपणात होणारा मधुमेह, लाडा, मोडी असे अनेक प्रकार आहेत. हल्ली ‘सोशलमीडिया’ या नावाचे आधुनिक कुरु क्षेत्र तयार झाले आहे. तिथे जर मी मोडी नावाचा मधुमेहाचा प्रकार आहे असे लिहिले तर काय होईल? मोडी हा कोणी मॉडी असाही उच्चारतात. टडऊ म्हणजे मॅच्युरिटी आॅनसेट डायबेटीस (आॅफ) यंग या शब्दांचे लघुनाम आहे.आपला देश हा विविध भाषा आणि संस्कृतीने नटलेला आहे. (शाळेनंतर हे वाक्य फार वर्षाने ते लिहून एकदम ‘गेले ते दिवस’ असे म्हणावेसे वाटले). त्यामुळे आपल्या देशांची विविधता अनेक ठिकाणी दिसते. कुठल्याही शब्दाचा उच्चार या विविधतेने नटलेला असतो. माझे एक स्नेही आहेत, कुमार देशपांडे नावाचे. त्यांचा अनुभव. मद्रासला गेले होते. हॉटेल सम्राटमध्ये जायचे होते. बºयाच टॅक्सीवाल्यांना विचारले की ‘हॉटेल सम्राट’ चलोगे क्या? पण कोणालाच हे सम्राट प्रकरण कळेना. शेवटी त्यांनी कागदावर इंग्रजीत लिहिले तेव्हा अनेक टॅक्सीवाल्यांच्या तोंडून ‘हॉटेल सॅमरॅट’ असे उद्गार निघाले. ज्या टॅक्सीत बसले त्या टॅक्सीवाल्याने त्यांना सुनावले ‘वॉट ब्यॅड स्पिकिंग स्टाइल सार’. हे झालं उच्चाराच्या बाबतीत. उच्चारांचे जेव्हा लिखाण होते तेव्हा अजून विविधता येते.तर मी मोडी किंवा मॉडी असा मधुमेहाचा प्रकार आहे असे लिहिले, की पुढे त्याचे मोदी व्हायला वेळ लागणार नाही. मग व्हॉटस्अ‍ॅप आणि फेसबुकवर पोस्ट यायला लागतील. ‘अमेरिकेमधे शास्त्रज्ञांनी मधुमेहाचा नवीन प्रकार शोधून काढला. त्याचे नाव आहे मोडी’. मग ‘या डायबेटीस बद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर मोडी येणे आवश्यक’ अशा पोस्ट फिरावयास लागतील. मग ‘मोडी नावाचा डायबेटीस टाळण्यासाठी काय करावे’ असे शीर्षक देऊन नांगरे पाटील, नाना पाटेकर, सद्गुरू, बिल गेट्स, गांधी यांच्या नावाने अनेक पोस्ट फिरतील. हे करताना कधीतरी ‘मोडी’ चा मोदी होईल. पेशवाईत ‘ध’ चा ‘मा’ झाल्याने जे झाले त्या पेक्षा ‘भारी’ काहीतरी होईल.माझा एक सर्जन मित्र म्हणतो, ‘जगात फक्त दोनच प्रकारचे लोक आहेत, सर्जन आणि नॉन सर्जन’. तसेच सोशल मीडियावर दोनच प्रकारचे लोक दिसतात. एका बाजूने बातमी आली की ‘जागतिक मधुमेह संघटनेने केला मोदींचा गौरव. त्यांचे नाव नुकत्याच शोध लागलेल्या मधुमेहाच्या नवीन प्रकाराला देण्यात आले आहे’. की लगेच विरु द्ध बाजूने तोफा डागल्या जातील, ‘व्यक्तिकेंद्रितपणा आणि नारसिसिझमचा अतिरेक. विविध शासकीय योजनांना पूर्वी जशी राजकीय नावे दिली जात तसे करता येत नसल्याने आता रोगाला आपले नाव देण्याचा अश्लाघ्य प्रकार उघडकीस.एवढे झाले की मग सुरू होते सोशल मीडियावरील मॅच. यालाच व्हायब्रंट सोशल मीडिया म्हणतात. तुम्ही पण बघा कुठे ‘ड’ चा ‘द’ करता येतो आहे का... १िस्रं३ंल्ल‘ं१ल्ल्र३्रल्ल@ॅें्र’.ूङ्मे

टॅग्स :Mumbaiमुंबई