शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा चालकाच्या मदतीने पटली जखमीची ओळख अनोळखी म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल : नातेवाईक येण्यापूर्वीच प्रौढ गेला निघून

By admin | Updated: March 29, 2016 00:24 IST

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जखमी अवस्थेत पडलेल्या एका जखमीला रिक्षाचालक रवींद्र एकनाथ पवार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने उपचार मिळण्यासह पवार यांच्याच प्रयत्नाने अनोळखी जखमीची ओळखदेखील पटली. पुरुषोत्तम पाटील असे त्यांचे नाव असून ते सुरतचे रहिवासी आहेत.

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जखमी अवस्थेत पडलेल्या एका जखमीला रिक्षाचालक रवींद्र एकनाथ पवार यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याने उपचार मिळण्यासह पवार यांच्याच प्रयत्नाने अनोळखी जखमीची ओळखदेखील पटली. पुरुषोत्तम पाटील असे त्यांचे नाव असून ते सुरतचे रहिवासी आहेत.
सोमवारी दुपारी एक ४० ते ४५ वर्षाचा प्रौढ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डोक्याला मार लागलेल्या व वारंवार खाली पडत असलेल्या अवस्थेत रवींद्र पवार या रिक्षाचालकास आढलले. त्यांनी व्यवसाय सोडून तत्काळ मदत करीत रक्तबंबाळ अवस्थेतील जखमीला जिल्हा रुग्णालयात हलविले. तेथे अनोळखी म्हणूनच नोंद करण्यात आली. उपचारादरम्यान जखमी अवस्थेतील प्रौढ वारंवार खाली पडत होता. तरीदेखील पवार हे त्याला स्ट्रेचरवर टाकत होते. उपचार होईपर्यंत ते तेथे थांबून होते. त्यानंतर त्यांनी जखमीच्या मोबाईलवरुन संपर्क साधला असता जखमीच्या पत्नीशी संपर्क झाला व अनोळखीची ओळख पटली. पुरुषोत्तम पाटील असे त्यांचे नाव असल्याचे समजले. ते लग्न सोहळ्यासाठी येथे आले असल्याचेही सांगण्यात आले.
पाटील यांच्या डोक्याला जबर मार लागलेला होता. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नातेवाईक जळगावला यायला निघायले. मात्र ते येण्यापूर्वीच संध्याकाळी पुरुषोत्तम पाटील हे जिल्हा रुग्णालयातून निघून गेले.
त्यानंतर रवींद्र पवार हे प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात आले असता, जखमी येथून निघून गेल्याचे समजले. त्यामुळे आपला व्यवसाय सोडून जखमीचा जीव वाचावा म्हणून मदत केली, मात्र ते उपचार पूर्ण होण्यापूर्वीच निघून गेल्याचे वाईट वाटते, असे संकटावेळी धावून आलेल्या रवींद्र पवार यांनी सांगितले.