शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्रेत्यांचा शंभर टक्के बंद ऑनलाईन औषध विक्रीला विरोध : अत्यावश्यक सेवेचा अनेकांनी घेतला लाभ

By admin | Updated: October 14, 2015 22:51 IST

जळगाव : देशात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणार्‍या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या संघटनेने (एआयओसीडी) बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी देशभर पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात आलेल्या आपत्कालीन सेवेला मोठा प्रतिसाद मिळाला.

जळगाव : देशात व राज्यात बेकायदेशीररीत्या चालविल्या जाणार्‍या ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेत्यांच्या संघटनेने (एआयओसीडी) बुधवार, १४ ऑक्टोबर रोजी देशभर पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला. दरम्यान, गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात आलेल्या आपत्कालीन सेवेला मोठा प्रतिसाद मिळाला. ऑनलाईन औषध विक्री थांबत नसल्याने संघटनेने बुधवारी बंद पुकारला होता. या बंदमध्ये जळगाव जिल्‘ातील २५०० पैकी २४५० विक्रेते सहभागी झोल होते, तर उर्वरित दुकान आपत्कालीन प्रसंगी औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुरू ठेवण्यात आली होती. बंद दरम्यान केमिस्ट भवन बाहेर बसून सर्व केमिस्ट बांधवांनी धरणे आंदोलन केले. लढा शासनाविरुद्ध ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात आमचा शासनाविरुद्ध लढा आहे, यात जनतेला वेढीस धरण्याचा कोणताही हेतू नाही, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून संघटनेच्यावतीने आपत्कालीन सेवा सुरु ठेवण्यात आली होती, असे संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी सांगितले. ...तर बेमुदत बंदआजचा बंद केवळ एक टोकन होते, देशभरात याला मोठा प्रतिसाद मिळाला. यापुढेही जर ऑनलाईन औषध विक्री थांबली नाही तर बेमुदत बंद पुकारण्यात येईल असे, असे जिल्हा संघटनेचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय केमिस्ट संघटनेचे कार्यकारीणी सदस्य सुनील भंगाळे यांनी दिला आहे. अत्यावश्यक सेवेला प्रतिसादया बंदच्या काळात गरजू रुग्णांसाठी अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्हा केमिस्ट संघटनेतर्फे शहरात वेगवेगळ्या परिसरात व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अन्न व औषध प्रशासन विभागानेदेखील सेवा उपलब्ध केली होती. या कक्षात साहाय्यक आयुक्त भु.पो.पाटील, औषध निरीक्षक अ.मा. माणिकराव यांनी काम पाहिले. या सेवेला मोेठा प्रतिसाद मिळाला. सकाळपासून रात्रीपर्यंत येथील दूरध्वनीवर रुग्णांनी संपर्क साधत या सेवेचा लाभ घेतला. येथे संपर्क साधल्यानंतर रुग्णांना त्या-त्या परिसरातील आपत्कालीन सेवा म्हणून सुरू असलेल्या मेडिकलची माहिती देण्यात येत होती. बंद यशस्वी करण्यासाठी सुनील भंगाळे, सचिव अनिल झवर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व जिल्हा पादाधिकारी, तालुकाध्यक्ष, सचिव यांच्यासह झोन प्रमुख राजीव चौधरी, अनिल कोळंबे, साहेबराव भोई, बाळू सोनवणे, दिनेश चौधरी, खलीद सैयद, राजेंंद्र पाटील, दिनेश मालू, परिमल पाटील, प्रवीण कोठावदे, प्रकाश चव्हाण, सनी मंथान, अमर लुल्ला, विलास नेहेते, विजय खडके,योगेश कलराणी आदींनी परिश्रम घेतले.