शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

किती दिवस झालेत पायी चालून?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 19:18 IST

व्यायाम म्हणून तुम्ही चालत असालही, पण छोट्यामोठ्या कामांसाठीही पायीच फिरुन बघा तर खरी..

- मयूर पठाडेबघा आठवून.. पायी चालून किती दिवस झालेत?.. म्हणजे घरातल्या घरात किंवा आॅफिसमध्ये जे काही चालावं लागत असेल ते नाही. काही जण विशेषत: कारखान्यांमध्ये काम करणारे वर्कर्स, कर्मचारी बरेच तास उभे असतात. उभं राहाण्याचा त्यांचा जॉबच असतो. काही कर्मचाºयांना आॅफिसातल्या आॅफिसातही बराच काळ चालावं लागतं.. अनेकांना वाटतं, त्यातच आमचा खूप व्यायाम होतो, पण वैद्यकीय परिभाषेत याला व्यायाम म्हणत नाहीत. उलट ज्या वेळेस तुम्ही एकच एक काम सातत्यानं करता, त्यावेळी तुमच्या शरीराच्या त्या विशिष्ट भागावरच जास्त ताण येतो, त्यावर अनावश्यक जबाबदारी पडते आणि त्याची जास्त झीजही होते..काही जण व्ययामानिमित्त सकाळी फिरायला जात असतील, काही जण रनिंग, जॉगिंग करत असतील, तो अपवाद, पण खरंच सांगा, गेल्या किती दिवसांत तुम्ही जवळच्याच कोपºयावर असलेल्या भाजीबाजारात किंवा टपरीवर पायी चालत भाजी आणलीत? किती वेळा पायी किराणा दुकानातून वस्तू घेऊन आलात? मुलांसाठी काही वह्या, पुस्तकं, पेन किंवा इतर गोष्टी आणण्यासाठी गल्लीतल्याच स्टेशनरी दुकानात पायीच गेलात?..बहुतांश याचं उत्तर नकारात्मकच येईल. या सगळ्या गोष्टी आपण बºयाचदा करतोही, पण कसं? आॅफिसातून येताना, कामात काम म्हणून किंवा फक्त त्याच कामासाठी गेलो तरी गाडीवरच जातो.अभ्यासकांचं म्हणणं आहे, रोज किमान काही वेळ तरी आपण पायी चाललं पाहिजे. त्यातून अनेक गोष्टी साध्य होतात. मुख्य म्हणजे तुमच्या आरोग्यासाठी चालणं अत्यंत उपयोगी आहे. व्यायाम म्हणून तुम्ही चालता, त्यापेक्षाही रोजच्या अशा साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही पायीच जाऊन करीत असाल, तर त्याचा जास्त उपयोग होतो हे आता सिद्ध झालेलं आहे.मुख्य म्हणजे यामुळे तुमचा ताणतणाव किमान निम्म्यानं कमी होतो. तुमचा संवाद वाढतो. हृदयाची शक्ती वाढते. उत्साह वाढतो. नवी आव्हानं घेण्यासाठी तुम्ही सज्ज होता..असं बरंच काही..मग पायी चालणार ना आता आजपासून?व्यायाम म्हणून तुम्ही चालत असलात, तरी जवळपासची छोटीमोठी कामंही जरा पायी फिरुनच करा. बघा.. तुम्हाला नक्कीच फ्रेश झाल्यासारखं वाटेल. नव्हे, तुम्ही व्हालच फ्रेश..अभ्यासकांचं म्हणणं आहे, रोज किमान काही वेळ तरी आपण पायी चाललं पाहिजे.व्यायाम म्हणून तुम्ही चालता, त्यापेक्षाही रोजच्या साध्या साध्या गोष्टी जर तुम्ही पायीच जाऊन करीत असाल, तर त्याचा जास्त उपयोग होतो.पायी चालण्यानं ताणतणाव कमी होतो. तुमचा संवाद वाढतो. हृदयाची शक्ती वाढते. उत्साह वाढतो.